सारी के फॉल सा! रोहितच्या लग्नातला विराट कोहली-सोनाक्षी सिन्हाचा डान्स Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 09:09 IST2023-02-24T09:08:30+5:302023-02-24T09:09:45+5:30

विराटचा हा डान्स पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Virat Kohli-Sonakshi Sinha Dance Video on saree ke fall sa song viral again | सारी के फॉल सा! रोहितच्या लग्नातला विराट कोहली-सोनाक्षी सिन्हाचा डान्स Video व्हायरल

सारी के फॉल सा! रोहितच्या लग्नातला विराट कोहली-सोनाक्षी सिन्हाचा डान्स Video व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानाबाहेरही फार अॅक्टिव्ह असतो हे सर्वांनाच परिचित आहे. विराट कोहलीला पंजाबी गाण्यांची आणि डान्सची तर खूपच आवड आहे. अनेकदा त्याचे डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आता एका व्हायरल व्हिडिओमध्ये तो चक्क अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सोबत नाचताना दिसत आहे. दोघेही 'सारी के फॉल सा'या गाण्याची हुक स्टेप करत आहेत. सध्याचा भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे.

रोहितच्या लग्नात विराट-सोनाक्षी थिरकले

२०१५ मध्ये कर्णधार रोहित शर्मा रितिकासोबत विवाहबंधनात अडकला. यावेळी सर्व भारतीय खेळाडू लग्नात उपस्थित होते. आता लग्नसोहळ्यात संगीत, डान्स तर झालंच पाहिजे. दरम्यान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा 'आर राजकुमार' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यातील 'सारी के फॉल सा'हे गाणं आणि त्या गाण्यावरची डान्स स्टेप खूप गाजली. विराटलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. खुद्द अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच तिथे उपस्थित होती म्हणल्यालवर दोघेही या गाण्यावर थिरकले. आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा तुफान व्हायरल होतोय.

विराटचा हा डान्स पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होतोय. नेहमीप्रमाणेच चाहत्यांना विराटचा डान्स खूप आवडलाय. हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. 

Web Title: Virat Kohli-Sonakshi Sinha Dance Video on saree ke fall sa song viral again