अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान वर्ल्ड कपचा सराव सोडून मुंबईत आला विराट कोहली, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:26 IST2023-10-02T12:24:40+5:302023-10-02T12:26:29+5:30

प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता विराट कोहलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

virat kohli return from guwahati to mumbai amid wife anushka sharma second pregnancy rumors | अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान वर्ल्ड कपचा सराव सोडून मुंबईत आला विराट कोहली, नेमकं कारण काय?

अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान वर्ल्ड कपचा सराव सोडून मुंबईत आला विराट कोहली, नेमकं कारण काय?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का आणि क्रिकेटर विराट कोहली  दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अद्याप अनुष्का आणि विराटकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता विराट कोहलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी गुवाहाटीवरुन मुंबईत आला आहे.  सध्या विराट आशिया वर्ल्ड कपच्या सरावासाठी गुवाहाटी येथे आहे.  याचदरम्यान त्याने गुवाहाटीवरुन मुंबईसाठी अचानक विमानाने प्रवास केला. विराट पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी मुंबईत आल्याच्या चर्चा आहेत. पण, विराट अचानक मुंबईत का आला? याबाबत अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाही.  

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नानंतर चार वर्षांनी २०२१मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. वामिका असं विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव आहे. आता पुन्हा ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Web Title: virat kohli return from guwahati to mumbai amid wife anushka sharma second pregnancy rumors