विराट कोहली अन् अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ‘या’ व्यक्तीमुळे बहरली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:29 IST2017-12-10T10:59:23+5:302017-12-10T16:29:23+5:30
सध्या सर्वत्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. असे म्हटले ...

विराट कोहली अन् अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ‘या’ व्यक्तीमुळे बहरली!
स ्या सर्वत्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. असे म्हटले जात आहे की, हे दोघे लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या दोघांचे नाते काही वर्षांचे नसून लहानपणापासूनचे आहे. वास्तविक विराट आणि अनुष्का लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. अनुष्का जेव्हा बंगळुरू येथे राहत होती. तेव्हा तिचे भाऊ कर्णेश आणि विराट यांची चांगली मैत्री होती. ते दोघेही एकाच ग्राउंडवर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी विराट बंगळुरू येथे क्रिकेट ट्रेनिंग घेत होता. हळूहळू तो कर्णेशच्या घरी येत जात होता. त्याचदरम्यान त्याची अनुष्कासोबत मैत्री झाली. पुढे हेसर्वच एकत्र क्रिकेट खेळत होते. पुढे अनुष्काचा भाऊ कर्णेशच्या सहमतीने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
पुढे लहानपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले, अन् आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. मधल्या काळात म्हणजेच जेव्हा अनुष्का ‘सुलतान’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती, तेव्हा त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र लगेचच काही दिवसांनंतर दोघांचे पॅचअप झाल्याचे समोर आले. दरम्यान, इटालियन डेस्टिनेशनवर होत असलेल्या या कपलच्या लग्नात मोजकेच लोक सहभागी होणार आहेत. शर्मा फॅमिलीच्या एका शेजाºयाशी चर्चा केली असता, त्यांनी विरुष्काच्या लग्नाच्या अफवा नसून, ते खरोखरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. तसेच अनुष्काच्या घराबाहेर कलरफुल लाइट्सचे डेकोरेशन केल्याचेही या शेजाºयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, गेल्या गुरुवारी रात्री उशिरा अनुष्का मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. तिच्यासोबत वडील अजयकुमार शर्मा, आई अशिमा, भाऊ कर्णेश शर्माही बघावयास मिळाले. त्याच्याबरोबर त्याच्या परिवाराचे पंडितही या परिवारासमवेत विदेशात रवाना झाले. त्यामुळे हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकतील असेच काहीसे चित्र दिसत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वीच लग्नात सहभागी होणाºया मोजक्याच पाहुण्यांची यादी समोर आली असून, त्यात बॉलिवूडमधील सात सेलिब्रिटी आणि दोन क्रिकेटपटू यांच्या नावांचा समावेश आहे.