विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:01 IST2023-12-11T11:46:47+5:302023-12-11T13:01:44+5:30

जाहिरातीच्या शूटसाठी जेव्हा विराट सेटवर पोहोचला तेव्हा...

Virat Kohli and Anushka Sharma celebrating 6 years of marriage Salman Khan was the reason for their patchup | विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा

विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा

भारतीय क्रिकेटपटू 'रन मशिन' विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)यांच्या लग्नाला आज 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेचा विषय ठरली. चाहत्यांनी त्यांना प्रेमाने 'विरुष्का' असं नावही दिलं. आज हे 'पॉवर कपल' म्हणून प्रसिद्ध आहे. विराट आणि अनुष्काची पहिली भेट खूपच विचित्र झाली होती. याचा किस्सा स्वत: विराटने अनेकदा मुलाखतींमध्ये ऐकवला आहे. 

अशी होती विरुष्काची पहिली भेट 

शॅम्पूच्या जाहिरातीसाठी विराट आणि अनुष्का एकत्र आले होते. जाहिरातीच्या शूटसाठी जेव्हा विराट सेटवर पोहोचला तेव्हा तो खूप नर्व्हस होता. कारण अनुष्का एक प्रोफेशनल अभिनेत्री होती आणि विराटला अभिनयाचं काहीच माहित नव्हतं. जेव्हा अनुष्का सेटवर आली तेव्हा तिने मोठ्या हीलची सँडल घातली होती. तेव्हा विराटने तिच्या उंचीवरुन आणि हील्सवरुन तिची चेष्टा केली होती. 'तुला नाही वाटत तुझी हील्स जरा जास्तच उंच आहे' असं तो म्हणाला होता. मात्र अनुष्काला तेव्हा तो जोक पटला नाही. आधीच नर्व्हस असलेल्या विराटचं अनुष्कासमोरचं फर्स्ट इम्प्रेशन काही खास झालं नाही. मात्र नंतर त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आणि ते प्रेमातही पडले. 2014 साली अनुष्का स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आली तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

ब्रेकअपच्या चर्चा अन् सलमान खानने घातली समजूत

विराट-अनुष्काच्या नात्यात एक वेळ अशीही आली जेव्हा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तेव्हाच अनुष्का सलमान खानसोबत 'सुलतान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. दोघांच्या भांडणात सलमानने उडी घेतली. माध्यम रिपोर्ट्सनुसार, त्यानेच दोघांना घरी बोलावलं आणि त्यांच्यातील वाद मिटवला. 

विराट-अनुष्का आज आदर्श जोडी आहे. विराटच्या प्रत्येक यश अपयशात अनुष्का खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. 2021 अनुष्काने मुलीला जन्म दिला. तर आता लवकरच ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या दोघांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

Web Title: Virat Kohli and Anushka Sharma celebrating 6 years of marriage Salman Khan was the reason for their patchup