विराट-अनुष्का करणार कोर्ट मॅरेज; विदेशात नव्हे तर भारतातच रंगणार लग्नसोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 21:29 IST2017-12-07T15:59:01+5:302017-12-07T21:29:01+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या अफवा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. परंतु एका ...

Virat-Anushka's Court Marriage; Weddings in India, not abroad! | विराट-अनुष्का करणार कोर्ट मॅरेज; विदेशात नव्हे तर भारतातच रंगणार लग्नसोहळा!

विराट-अनुष्का करणार कोर्ट मॅरेज; विदेशात नव्हे तर भारतातच रंगणार लग्नसोहळा!

रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या अफवा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. परंतु एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आता दोघांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. होय, सूत्रानुसार दोघांचे लग्न जवळपास निश्चित झाले असून, केवळ तारखांचा गोंधळ झाला आहे. गेल्या बुधवारपासून विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा समोर येत आहेत. परंतु अनुष्का शर्माच्या पीआरकडून या अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर या चर्चांना काहीसा ब्रेक मिळाला.  

सूत्रानुसार, विराट आणि अनुष्काची कुंडली जुळली असून, ग्रहानुसार १२, १८, २१ डिसेंबर २०१७ आणि ५ जानेवारी २०१८ असे चार मुहूर्त काढण्यात आले आहेत. मात्र या वर्षातील डिसेंबर महिन्यात उच्च ब्राह्मण समाजातील लग्न होत नसल्याने विरुष्काच्या लग्नात अडथळा निर्माण झाला आहे. परंतु अनुष्का या सर्व गोष्टींकडे वेगळ्या विचाराने बघत असल्याने तिने या सर्व तारखा रद्द केल्याचेही समजते. 

सूत्रानुसार हेदेखील सांगितले जात आहे की, विराट आणि अनुष्का अगोदर कोर्ट मॅरेज करण्याच्या मन:स्थितीत असून, त्याकरिता त्यांनी बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात अर्जदेखील केला आहे. अनुष्काने तिच्या वकिलांकडून चार रजिस्ट्रेशन फॉर्म खरेदी केले असून, त्यामध्ये साक्षीदारांच्या फॉर्मचाही समावेश आहे. दोघेही विदेशात नव्हे तर भारतातच लग्न करू इच्छित आहेत. भारतात अतिशय साध्या पद्धतीने हे दोघे लग्न उरकणार असून, यामध्ये नातेवाईक आणि मोजक्याच मित्रमंडळीला आमंत्रित केले जाणार आहे. 

Web Title: Virat-Anushka's Court Marriage; Weddings in India, not abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.