व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशच्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटवर सनसनी, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 21:23 IST2018-03-15T15:32:46+5:302018-03-15T21:23:48+5:30
व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती प्रिन्सेस लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या वाºयासारखे व्हायरल होत आहेत.

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशच्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटवर सनसनी, पाहा फोटो!
आ ल्या अदा आणि डोळा मारण्याच्या अनोख्या स्टाइलमुळे इंटरनेटवर अजूनही व्हायरल होत असलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियाने नुकतेच फोटोशूट केले असून, त्यामध्ये पिंक कलरच्या ड्रेसमध्ये ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. प्रियाचे हे फोटो वुडपिकर फोटोग्राफीचे अनाज जफर यांनी शूट केले आहेत. तिचे यातील काही निवडक फोटो एजन्सीने स्वत:च त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर व्हायरल गर्ल प्रियानेही काही फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत.
दरम्यान, प्रियाने हे फोटो पोस्ट करताच त्यास यूजर्सकडून प्रचंड प्रमाणात लाइक्स केले जात आहे. शिवाय काही वेळातच प्रियाचे हे फोटो वाºयासारखे व्हायरलही होत आहेत. २४ तासातच प्रियाच्या या फोटोंना जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. या पोस्टला कॉमेंट्स देणाºया यूजर्सनीसुद्धा प्रियाला प्रिन्सेस म्हणूनच कॉमेण्ट दिल्या. प्रियाच्या इन्स्टाग्रामवर सध्या ५१ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. प्रिया प्रकाशने गुगल सर्चमध्येही आयटम गर्ल सनी लिओनी हिला धोबीपछाड दिली आहे.
व्हॅलेंटाइन डेच्यानिमित्त प्रिया प्रकाशचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने प्रियाला रातोरात सुपरस्टार बनविले. शिवाय हे एक रेकॉर्डही ठरले. प्रियाचा मल्याळम भाषेतील चित्रपट ३ मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रियाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला तो शालेय जीवनातील रोमान्सवर आधारित गाण्याशी संबंधित होता. ज्यामध्ये प्रिया एका तरुणाचे इशारो-इशारोमध्येच मन जिंकते.