शाहरुख खानसोबत तुलना झाल्यावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया; म्हणाला, "तो ३५ वर्षांपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:35 IST2024-11-15T16:35:23+5:302024-11-15T16:35:47+5:30

विक्रांत मेस्सीने चाहत्यांचे आभार मानले पण म्हणाला...

Vikrant Massey reacts to being compared with shahrukh khan says it is unfair to him | शाहरुख खानसोबत तुलना झाल्यावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया; म्हणाला, "तो ३५ वर्षांपासून..."

शाहरुख खानसोबत तुलना झाल्यावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया; म्हणाला, "तो ३५ वर्षांपासून..."

अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) '12th फेल' सिनेमामुळे रातोरात स्टार झाला. टीव्ही ते बॉलिवूड असा त्याचा प्रवास आहे. टीव्हीवरील 'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेतही तो दिसला होता. 'लुटेरा' मध्ये त्याने रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर केली. तर 12th फेल सिनेमाने त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. एका चाहत्याने विक्रांतची तुलना शाहरुखशी केली. यावर विक्रांत मेस्सीने प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखसोबत तुलना होणं योग्य नाही असं तो म्हणाला.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सी म्हणाला, "ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्याने कोणी मला ही कॉम्प्लिमेंट दिली आहे तो हे ऐकत असेल तर मला त्याचे वैयक्तिकरित्या आभार मानायचे आहेत. पण ही खूपच मोठी गोष्ट आहे. हे असं ऐकलं की चांगलं वाटतं. पण शाहरुख इंडस्ट्रीत ३५ वर्षांपासून काम करत आहे आणि मला तर आता कुठे १०-१२ वर्ष झाली आहेत. त्यांच्याशी तुलना होणं हे त्यांच्यासाठी अनफेअर आहे. पण मला खरंच खूप सम्मानित वाटत आहे."

शाहरुख खाननेही टीव्हीतूनच करिअरला सुरुवात केली होती. तो देखील  इंडस्ट्रीत आऊटसायडरच होता. 'फौजी' ही त्याची मालिका खूप गाजली होती. नंतर त्याने 'दीवाना' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. विक्रांत मेस्सीचा  'द साबरमती रिपोर्ट' नुकताच रिलीज झाला. यातही त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे.

Web Title: Vikrant Massey reacts to being compared with shahrukh khan says it is unfair to him