Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 12:14 IST2020-01-04T12:12:42+5:302020-01-04T12:14:10+5:30

Vikrant Massey's Wedding :अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

Vikrant massey planning wedding in 2020 with model girlfriend sheetal thakur | Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट

Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट

अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. विक्रांत सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत आहे. छपाकमध्ये विक्रांत दीपिका पादुकोणसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर याच वर्षी तो लग्नाच्या बंधनातदेखील अडकणार असल्याची चर्चा आहे.  


एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार विक्रांत 2020मध्येच लग्न करणाची शक्यता आहे. विक्रांत गेल्या अनेक दिवसांपासून मॉडल आणि अभिनेत्री शीतल ठाकूरला डेट करतो आहे. ऐवढेच नाही तर दोघांनी साखरपुडासुद्धा केला आहे.  


विक्रांत आणि शीतल 2015मध्ये पासून एकमेकांना डेट करतायेत. त्यांनी आपलं रिलेशनशीप नेहमीच मीडियापासून दूर ठेवलं.  2017मध्ये सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत आपलं रिलेशनशीप ऑफिशियल केलं. 


छपाकनंतर विक्रांत 'मिर्जापूर' आणि 'डेथ इन द गंज' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. छपाकशिवाय 'कार्गो' मध्ये सुद्धा दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती अनुराग कश्यप आणि श्लोक शर्मा करतो आहे. यात विक्रांतसोबत श्वेता त्रिपाठीसुद्धा दिसणार आहे.     

Web Title: Vikrant massey planning wedding in 2020 with model girlfriend sheetal thakur