अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:44 IST2019-06-18T13:43:43+5:302019-06-18T13:44:49+5:30
दिल्लीत एका शूटींगदरम्यान विक्रांतला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. कदाचित आयुष्यभर तो ही घटना विसरू शकणार नाही.

अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!!
अभिनेता विक्रांत मेस्सीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. साहजिकच, विक्रांतची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. आता फॅन्स म्हटल्यावर काही चित्रविचित्र घटनांचा सामना करणेही आलेच. विक्रांतला अलीकडे अशाच एका घटनेचा सामना करावा लागला.
दिल्लीत एका शूटींगदरम्यान विक्रांतला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. कदाचित आयुष्यभर तो ही घटना विसरू शकणार नाही. तर घटना आहे, दिल्लीच्या साकेत भागातील. मिड डेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
६ जून २०१९ रोजी विक्रांत नेहमीप्रमाणे शूटींगमध्ये बिझी होता. अचानक तरूणी त्याला भेटण्यासाठी सेटवर येऊन धडकली. खरे तर सेटवर सुरक्षेची पूर्ण व्यवस्था होती. पण या तरूणीने सगळ्यांच्या नाकात दम आणला. वधूच्या पोशाखात ती सेटवर पोहोचली आणि जोरजोराने रडत विक्रांतला भेटायचा हट्ट करू लागली. मला विक्रांतला भेटू दिले नाही तर मी लग्नच करणार नाही, असे म्हणून तिने सेटवर नको इतका गोंधळ घातला. तासभर झाला तरी ती बधेना म्हटल्यावर अखेर विक्रांत तिला भेटला आणि त्याने तिला लग्नमंडपात जाण्यासाठी समजावले. पण त्याऊपरही ती समजेना. ती लग्नमंडपात जाईना म्हटल्यावर सगळ्यांचाच नाईलाज झाला आणि शेवटी पोलिसांना बोलवावे लागले.
विक्रांतला भेटण्यासाठी ही तरूणी लग्नमंडपातून पळून आली होती. या घटनेमुळे विक्रांतला चांगलाच धक्का बसला. यावर काय रिअॅक्ट करावे, हेच त्याला कळेना. आधी त्याने नवरीची शांतपणे समजूत काढली. कारण त्याच्यामुळे तिचे लग्न तुटावे, अशी विक्रांतची इच्छा नव्हती. त्या तरूणीला तो सुखरूप घरी पोहोचू इच्छित होता. पण सरतेशेवटी तोही थकला आणि पोलिसांना बोलवले गेले. पोलिसांनी कसे बसे या नवरीला तिच्या घरी पाठवले. पण यामुळे तब्बल चार तास विक्रांतच्या चित्रपटाचे शूटींग थांबले.
विक्रांत लवकरच ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘छपाक’ हा सिनेमा अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे.