Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील करायचे अभिनय, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबियांविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:47 AM2019-09-30T11:47:02+5:302019-09-30T11:54:42+5:30

Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून विजू खोटे आणि त्यांची बहीण शुभा खोटे यांनी देखील अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Viju Khote Death: viju khote family | Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील करायचे अभिनय, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबियांविषयी

Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील करायचे अभिनय, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबियांविषयी

googlenewsNext
ठळक मुद्देशुभा खोटे यांची मुलगी भावना बलसावर ही देखील अभिनेत्री असून विजू खोटे, शुभा खोटे आणि भावना यांनी जबान संभालके या मालिकेत काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी गावदेवीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ३०० हून अधिक मराठी-हिंदी भूमिका त्यांनी साकारल्या. शोले, अंदाज अपना अपना, अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या.

गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी चांगली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. 

विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून विजू खोटे आणि त्यांची बहीण शुभा खोटे यांनी देखील अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्या दोघांनीही आपल्या अभिनयाने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक जागा निर्माण केली. प्रसिद्ध अभिनेत्री दुर्गा खोटे या देखील त्यांच्या नातेवाईक होत्या. 

शुभा खोटे यांची मुलगी भावना बलसावर ही देखील अभिनेत्री असून विजू खोटे, शुभा खोटे आणि भावना यांनी जबान संभालके या मालिकेत काम केले आहे. विजू खोटे यांच्या पत्नीचे नाव निमा होते. विजू खोटे त्यांचा मुलगा लकी, सून तेजश्री आणि नात नयनिका यांच्यासोबत राहात होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. 

सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला. 
 

Web Title: Viju Khote Death: viju khote family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.