तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा फातिमाच्या प्रेमात? म्हणाला, "जर प्रेम खरं असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:56 IST2025-11-23T09:55:57+5:302025-11-23T09:56:33+5:30
अभिनेत्यानं प्रेमावर भाष्य केलं. जे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा फातिमाच्या प्रेमात? म्हणाला, "जर प्रेम खरं असेल तर..."
बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या मनोरंजन जगतात रंगल्या आहेत. तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्माचं नाव बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं जात आहे. विजय वर्मा आणि फातिमाला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच अभिनेत्यानं प्रेमावर भाष्य केलं. जे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
विजय वर्मा 'गुस्ताखी इश्क' या चित्रपटातून पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटात त्याने फातिमासोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'गुस्ताखी इश्क' हा चित्रपट प्रेमावर आधारित असल्याने, आयएएनएसशी संवाद साधताना विजय वर्माला प्रेमात दिल्या जाणाऱ्या 'माफी'बद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. प्रेमात अविवेकीपणा आला तर त्याला माफी मिळू शकते का? या प्रश्नावर विजय वर्मा म्हणाला, "माझं मत स्पष्ट आहे जर प्रेम खरे असेल, तर सर्व अविवेकीपणा माफ केला पाहिजे". खरे प्रेम सर्व चुकांना क्षमा करतं, यावर विजय वर्माचा विश्वास असल्याचे दिसून आले.
तमन्ना आणि विजय वर्माचं ब्रेकअप का झालं?
सियासत डेलीच्या वृत्तानुसार, लग्नाबद्दलच्या वेगवेगळ्या विचारांमुळे हे जोडपं वेगळं झाले. ३० वर्षीय तमन्ना भाटिया विजयसोबत लग्न करण्यासाठी उत्साहित होती, पण विजयला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. दोघे दीर्घ काळापासून डेट करत होते. त्यांनी 'लस्ट स्टोरीज २'मध्ये एकत्र काम केले होते. तमन्ना भाटियाने तिच्या चित्रपटांमध्ये खूप कमी इंटिमेट सीन्स केले आहेत. तिने ने किंसीग सीन्स पॉलिसी पाळली होती. मात्र लस्ट स्टोरीमध्ये विजय वर्मासोबत काम करताना तिने या पॉलिसीला बासनात गुंडाळले होते.