तमन्ना भाटियासोबत बोहल्यावर चढणार विजय वर्मा?, अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला- "मी आईला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:27 IST2023-11-27T09:26:07+5:302023-11-27T10:27:51+5:30

तमन्नासोबत विजय वर्मा सात फेरे घेणार असल्याचं बोललं जातंय. यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Vijay varma give response on tie know with tamannaah soon jaane jaan actor reacts | तमन्ना भाटियासोबत बोहल्यावर चढणार विजय वर्मा?, अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला- "मी आईला..."

तमन्ना भाटियासोबत बोहल्यावर चढणार विजय वर्मा?, अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला- "मी आईला..."

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत.  काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसले.  दोघांच्या लग्नाची चर्चा मीडियामध्ये सुरु आहे. दोघेही लवकरच सातफेरे घेणार असल्याचं बोललं जातंय. 

या चर्चांवर आता खुद्द विजय वर्माने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने सांगितले की त्याची आई त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारते. 'साहित्य आजतक'च्या कार्यक्रमात विजय म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही मुलीला मी लग्न करावे असे वाटत नाही. याचे उत्तर ना मी माझ्या आईला देऊ शकतो ना इतर कोणाला.”

विजय वर्माने अलीकडेच त्याच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला की हे  फोटो तमन्ना भाटियाने काढले होते. तमन्नासोबत विजय व्हॅकेशनवर गेल्याची चर्चा होती. मात्र, विजयने तमन्नासोबतचा एकही फोटो शेअर केला नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला डीएनएला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्माने त्यांच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले होते. विजय म्हणाला की, तो मारवाडी समाजातून येतो. या समाजात अनेकदा लहान वयात मुलांची लग्ने होतात. त्यामुळे त्याच्यावर लग्नासाठी खूप दबाव होता. तरीही त्याने अजून लग्न केलेले नाही.'' 

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम करताना दिसले होते. एका रिपोर्टनुसार, दोन्ही स्टार्स या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पहिल्यांदाच गोव्यात न्यू इयर सेलिब्रेट करताना दिसले, त्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या.

Web Title: Vijay varma give response on tie know with tamannaah soon jaane jaan actor reacts