...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:18 PM2022-07-29T15:18:37+5:302022-07-29T15:19:19+5:30

Vijay deverakonda: अलिकडेच विजयने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अनन्या पांडेदेखील उपस्थित होती.

vijay deverakonda says he willing to pose nude also ready for condom adds koffee with karan | ...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

googlenewsNext

अतरंगी स्टाइलमुळे चर्चेत येणारा रणवीर (ranveer singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच रणवीरने सोशल मीडियावर त्याचे न्यूड फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यात काहींनी त्याला विरोध केला आहे. तर, काहींनी पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत या प्रकरणी अनेक कलाकारांनी त्यांची मत मांडली आहेत. यामध्येच आता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay deverakonda) यानेही न्यूड फोटोशूट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अलिकडेच विजयने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. या कार्यक्रमात करणने विजयला काही प्रश्न विचारले. त्यात न्यूड फोटोशूट करशील का?या प्रश्नावर विजयने होकारार्थी उत्तर देत त्यामागचं कारण सांगितलं.

'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरने विजय देवरकोंडासह रॅपिड फायर खेळला. यावेळी त्याने  ‘तू एखाद्या आंतरराष्ट्रीय मासिकासाठी न्यूड फोटोशूट करशील का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर विजयने हो असं उत्तर दिलं.

"जर ते न्यूड फोटोशूट चांगल्या पद्धतीने शूट करण्यात आलं. तर मला काहीच हरकत नाही", असं उत्तर देत विजयने न्यूड फोटोशूट करण्यास संमती असल्याचं सांगितलं.

दरम्यान, रणवीर सिंगने २३ जुलै रोजी सोशल मीडियावर त्याच्या न्यूड फोटोशूटचे काही फोटो शेअर केले. हे फोटो पाहिल्यावर एकच खळबळ उडाली. इतकंच नाही तर, त्याच्यावर एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. मात्र, यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत.
 

Web Title: vijay deverakonda says he willing to pose nude also ready for condom adds koffee with karan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.