विजय देवरकोंडाच्या 'लाईगर' चित्रपटाच्या टीझरने तोडले रेकॉर्ड्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:02 IST2022-01-04T15:02:08+5:302022-01-04T15:02:38+5:30
विजय देवरकोंडा(Vijay Devarakonda) चा लाईगर (Liger Movie) चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

विजय देवरकोंडाच्या 'लाईगर' चित्रपटाच्या टीझरने तोडले रेकॉर्ड्स
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) यांच्या लाईगर (साला क्रॉसब्रीड) (Liger Movie)या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाची भेट म्हणून लाँच करण्यात आली. हा व्हिडिओ प्रेक्षकांना एड्रेनालाईन पंपिंग MMA फाईटींग सेक्वेन्सची, तसेच 'स्लम डॉग ऑफ स्ट्रीट्स ऑफ मुंबई' आणि 'चाय वाल्याच्या' संघर्षांची झलक देतो.
उत्कृष्ट स्टायलिश अवतारांमध्ये आपल्या नायकांची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाणारे डॅशिंग दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी या बहुप्रतिक्षित पॅन इंडिया प्रोजेक्टमध्ये विजय देवरकोंडाला यापूर्वी कधीही न पाहिलेला स्टायलिश आणि अॅक्शन अवतारात दाखवले आहे. त्यांनी विजयच्या व्यक्तिरेखेला वेगळ्या, ट्रेंडी आणि आक्रमक लूक मध्ये रूपांतरित केले आहे, त्याच्या या मेकओव्हरने सर्वांनाच थक्क केले आहे.
लाईगरच्या झलकने आता सर्व आगामी पॅन इंडिया चित्रपटांसाठी एक नवा बेंचमार्क सेट केला आहे. या व्हिडिओने केवळ ७ तासांत मागील सर्व सर्वोत्तम रेकॉर्ड तोडले असून केवळ २४ तासांत १६ दशलक्ष व्ह्यूज मिळवणारा व्हिडिओ जाहीर झाला आहे जो सध्या युट्यूबवर टॉपला ट्रेंड करत आहे.
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित, धर्मा प्रोडक्शन आणि पुरी कनेक्ट्स अंतर्गत करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता आणि हिरू यश जोहर निर्मित, लाईगर साला क्रॉसब्रीड हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.