सिद्धार्थ-कियारा नंतर बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवाल चढणार बोहल्यावर, लंडनमध्ये घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 01:25 PM2023-10-05T13:25:56+5:302023-10-05T13:30:00+5:30

दोघांनी २०२१मध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता अभिनेता लंडनमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.

Vidyut jamwal nandita mahtani wedding updates couple to be get married soon in london report says | सिद्धार्थ-कियारा नंतर बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवाल चढणार बोहल्यावर, लंडनमध्ये घेणार सातफेरे

सिद्धार्थ-कियारा नंतर बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवाल चढणार बोहल्यावर, लंडनमध्ये घेणार सातफेरे

googlenewsNext

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल सध्या काय तर रिलेशनशिप स्टेट्समुळे चर्चेत आहे.  विद्युत एका फॅशन डिझायनरला अनेक वर्षांपासून डेट करतोय. बॉलिवूडची दिग्गज फॅशन डिझायनर नंदिता माहतानीला डेट करतोय. नंदिताने विद्युत अनेकवेळा पब्लिक प्लेसमध्ये एकत्र स्पॉट झालेत. 2021 सालापासून तो फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांची एंगेजमेंटही झाली होती. नंतर, मीडियामध्ये त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या, पण दरम्यान, अभिनेता लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

पॉप डायरीजच्या रिपोर्टमध्ये विद्युत जामवालच्या लग्नाची चर्चा आहे. लंडनमधील टिनसेल टाऊनमध्ये ते लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  दोघांनी आधीच लग्न केल्याच्या बातम्याहीसमोर येतायेत, मात्र यावर कोणतेच अधिकृत वक्तव्यसमोर आलेले नाही.  

 2021मध्ये दोघांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लवकरच दोघे लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. नंदिता माहतानी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे.  

बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वत: स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. विद्युतही आधी मोना सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2 वर्षे दोघांचे अफेअर सुरू होते. विद्युतशी घटस्फोट झाल्यानंतर मोनाने बिझनेसमॅन श्याम गोपालनसोबत लग्न केले.

Web Title: Vidyut jamwal nandita mahtani wedding updates couple to be get married soon in london report says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.