विद्या म्हणते, करिअरच्या पुनरुत्थानाची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:10 IST2016-06-11T11:40:00+5:302016-06-11T17:10:00+5:30

द डर्टी पिक्चर, कहानी आणि त्यानंतर आलेल्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कामगिरी केली नाही. परंतु विद्या बालनच्या अनुसार तिच्या ...

Vidya says, there is no need of a career revival | विद्या म्हणते, करिअरच्या पुनरुत्थानाची गरज नाही

विद्या म्हणते, करिअरच्या पुनरुत्थानाची गरज नाही

डर्टी पिक्चर, कहानी आणि त्यानंतर आलेल्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कामगिरी केली नाही. परंतु विद्या बालनच्या अनुसार तिच्या करिअरच्या पुनरुत्थानाची सध्या तरी कोणतीही गरज नाही.
महिला केंद्रीत चित्रपट करण्याकडे विद्या बालनचा कल अधिक राहिला होता. त्यानंतर घनचक्कर, बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर साफ आदळले. टी३एनच्या माध्यमातून आपले करिअर वाचविण्याचा तिचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसात कहानी २ हा प्रदर्शित होतो आहे.
‘प्रत्येक चित्रपटापासून तुम्हाला अपेक्षा असतात. माझ्या आयुष्यात अनेक चढउतार मी अनुभवले आहेत. केवळ हिट किंवा फ्लॉप चित्रपट देणे शक्य नसते. मला माझ्या करिअरकडे नव्याने पाहण्याची गरज नसल्याचे विद्याने सांगितले. कहानी २ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असून, मी चांगले काम केले आहे. त्याबाबत मी आनंदी आहे. चित्रपटाच्या भविष्याबाबत मी चिंताग्रस्त नसते, असे विद्या म्हणाली.

Web Title: Vidya says, there is no need of a career revival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.