गणिताची जादू दाखवणाऱ्या... विद्या बालनच्या शंकुतला देवीची मजेशीर ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 02:25 PM2020-07-15T14:25:31+5:302020-07-15T14:25:38+5:30

शंकुतला देवींची भूमिका विद्याने हुबेहुबे साकारली आहे.

Vidya balan's shakuntala devi biopic's trailer out | गणिताची जादू दाखवणाऱ्या... विद्या बालनच्या शंकुतला देवीची मजेशीर ट्रेलर पाहिलात का?

गणिताची जादू दाखवणाऱ्या... विद्या बालनच्या शंकुतला देवीची मजेशीर ट्रेलर पाहिलात का?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा बहुप्रतिक्षित बायोपिक  सिनेमा 'शंकुतला देवी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका विद्या साकारते आहे. शंकुतला देवींची भूमिका विद्याने हुबेहुबे साकारली आहे याचा अंदाज सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर येतो. सव्वा दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये शंकुतला देवी यांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आला आहे. शंकुतला देवीच्या भूमिकेत विद्याने स्वत;ला संपूर्णपणे सामावून घेतले आहे. ट्रेलरमधील विद्याची देहबोली, संवाद सगळेच खूप छान आहे. ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. शंकुतला देवींची भूमिका साकारण्यासाठी विद्याने विशेष मेहनत घेतल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. 

‘शंकुतला देवी’ सिनेमात अभिनेत्री सान्‍या मल्‍होत्रा शंकुतला देवीच्‍या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्‍या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते हे या ट्रेलरमधून अधोरेखित होते आहे.  तसेच या चित्रपटामध्‍ये जीशू सेनगुप्‍ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.  कॅलक्युलेटरहून वेगवान असा ह्यूमन-कंप्यूटर अशी ओळख  गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांची होती. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील सामील आहे. विद्या बालनचे फॅन्स या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने करत आहे.त्यांचा हा प्रवास सिनेमाच्या रुपात रुपेरी पडद्यावर उलगणार आहे. 31 जुलैला ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

Web Title: Vidya balan's shakuntala devi biopic's trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.