...अन् चाहत्याच्या मदतीला धावली विद्या बालन, 'त्या' कृतीनं जिंकली मनं, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:15 IST2026-01-07T11:12:05+5:302026-01-07T11:15:52+5:30
VIDEO:लिफ्टमध्ये अडकणाऱ्या चाहत्याच्या मदतीला धावली विद्या बालन,'त्या' कृतीचं होतंय कौतुक

...अन् चाहत्याच्या मदतीला धावली विद्या बालन, 'त्या' कृतीनं जिंकली मनं, व्हिडीओ व्हायरल
Vidya Balan Viral Video: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या साधेपणाने आणि भारतीय सौंदर्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी व बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). भरतनाट्यम व कथक नृत्यात पारंगत असणारी विद्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात म्युझिक व्हिडीओ, दूरचित्रमालिका आणि जाहिरातींमधून केली. तशी छोट्या पडद्यावरची तिची कारकिर्द वयाच्या १६ व्या वर्षीच एकता कपूरच्या 'हम पाँच' हा दूरचित्रमालिकेतून सुरु झाली होती.सध्याच्या घडीला ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयामुळेच तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
अलिकडच्या काळात विद्या सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. याचदरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हायरल होणारा व्हिडीओ सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.या व्हिडीओमधून विद्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, या इन्स्टाग्राम पेजवर विद्या बालनचा एका ठिकाणी जात असतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पडद्यावर दिसणारी ही नायिका खऱ्या आयुष्यात माणूस म्हणून कशी आहे, याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून येतो.
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, विद्या बालन एका ठिकाणी जात असताना तिच्या आजुबाजूला चाहत्यांचा गराडा दिसतोय. त्याचदरम्यान, तिला भेटण्यासाठी लिफ्टमधून एक व्यक्ती येत असताना अचानक लिफ्टचा दरवाजा बंद होतो.तितक्याच विद्याचं लक्ष त्या लिफ्टकडे जाते.त्या व्यक्तीला कोणतीही इजा होऊ नये म्हणून विद्या लिफ्टमध्ये अडकणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाते. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या कृतीचं कौतुक होत आहे. या व्हिडीओवर "So Sweet Vidya Balan...",
तसेच "Beautiful Soul...", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.