विद्या बालनसोबत लोकलमध्ये घडला होता ‘हा’ किळसवाणा प्रकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:25 IST2017-10-03T09:55:49+5:302017-10-03T15:25:49+5:30
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. आत्तापर्यंत अनेकजणी याबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. आता या यादीत विद्या ...
.jpg)
विद्या बालनसोबत लोकलमध्ये घडला होता ‘हा’ किळसवाणा प्रकार!
ब लिवूडच्या अनेक अभिनेत्रींना छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. आत्तापर्यंत अनेकजणी याबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. आता या यादीत विद्या बालन ही सुद्धा सामील झालीय. होय, ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’ सारखे दमदार चित्रपट देणाºया विद्याने कॉलेजच्या दिवसातील तिच्यासोबत घडलेली अशीच एक घटना शेअर केली आहे. लोकल ट्रेनमध्ये घडलेला एक किळसवाणा प्रकार तिने सर्वांसमोर सांगितला आहे.
अलीकडे विद्या ‘नो फिल्टर नेहा’ या नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये विद्याने हा किस्सा कथन केला. ही घटना घडली तेव्हा विद्या मुंबईच्या जेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होती. एकेदिवशी विद्या कॉलेज संपवून मैत्रिणींसोबत लोकलने घरी परतत येत होती. त्यादिवशीची ही घटना. विद्याने सांगितले की, आम्ही तिघी मैत्रिणी होतो. लोकलच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये आम्हीबसलो होतो. आमच्या गप्पा रंगात आल्या असतानाच, एक मुलगा आमच्या डब्यात चढला आणि आमच्या समोरच्या सीटवर येऊन बसला. हा लेडीज डबा आहे, असे आम्ही त्याला म्हणालो. यावर आपण चुकून या डब्यात चढलो, असा आव त्याने आणला. अरे, हा लेडीज डबा आहे का? मी पुढच्या स्टेशनचा उतरतो, असे तो म्हणाला. पुढच्या स्टेशनला तो गेटवर जावून उभा झाला. आम्हाला वाटले तो उतरेल. पण ट्रेन सुरू झाली तरी तो उतरला नाही. उलट खिडकीजवळच्या सीटवर येऊन बसला. काहीतरी गडबड आहे, हे तोपर्यंत आम्हा तिघींच्याही लक्षात आले होतेच. याचदरम्यान त्या मुलाने अचानक आपल्या पँटची जिप उघडली अन् तो आमच्यासमोर हस्तमैथुन करू लागला. मग काय, माझ्या हातात पेपर पॅड वा फाईलसारखे काही होते. मी त्यानेच त्याला जोरदार चोप दिला. शेवटी त्याची कॉलर पकडली अन् त्याला चालत्या ट्रेनमधून धक्का दिला. नशिबाने स्टेशन आले होते, म्हणून तो वाचला नाही तर तो तिथेच ठार झाला असता.
विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटात विद्या नाईट रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे.
ALSO READ : Teaser poster out : मेरी सुलू! पलट सुलू!! का चेहरा लपवतेयं विद्या बालन?