लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:48 IST2026-02-22T14:47:15+5:302026-02-22T14:48:15+5:30

विदिशा सध्या काश्मीरच्या सहलीवर असून तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहे.

vidisha mhaskar kashmir vacation bumro dance video viral | लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स

लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स

सोशल मीडिया हे आजच्या काळात केवळ मनोरंजनाचे साधन उरले नसून, कलाकारांना आपल्या चाहत्यांशी थेट जोडणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. कलाकार अनेकदा त्यांचे डान्स व्हिडिओ, वैयक्तिक आयुष्यातील क्षण आणि प्रवासाचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच, लोकप्रिय मराठी अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

विदिशा सध्या काश्मीरच्या सहलीवर असून तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहे. तिने श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवरात शिकारात बसून 'मिशन काश्मीर' चित्रपटातील गाजलेल्या 'बुम रो...' या गाण्यावर डान्स केलाय. याचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विदिशाने सुंदर काश्मिरी पारंपरिक पोशाख आणि दागिने परिधान केले असून ती अत्यंत लोभस दिसत आहे.

विदिशानं हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक भावनिक कॅप्शनही दिले आहे. ती म्हणाली, "जेव्हा तुम्ही तुमचे लहानपणीचे 'बुमरो' गाण्यावर डान्स करण्याचे स्वप्न पूर्ण करत असता...". २००० साली प्रदर्शित झालेल्या 'मिशन काश्मीर' चित्रपटातील प्रिती झिंटावर चित्रित झालेले 'बुमरो' हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. विदिशाचे अप्रतिम हावभाव आणि तिच्या डान्स स्टेप्स पाहून चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे आणि काश्मिरी लूकचे कौतुक केले आहे.


विदिशाचा अभिनय प्रवास
विदिशा म्हसकर सध्या कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत 'तेजा' ही प्रमुख भूमिका साकारत आहे. पाच मैत्रिणींच्या या गोड गोष्टीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याआधी विदिशाने केवळ सकारात्मकच नाही, तर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही ताकदीने साकारल्या आहेत. तिच्या कामाची झलक 'रंग माझा वेगळा', '३६ गुणी जोडी', 'भाग्य दिले तू मला', 'सुखाच्या सरींनी मन हे बावरे' या मालिकांमध्ये पाहायला मिळाली आहे.

Web Title : विदिशा म्हस्कर ने कश्मीर में 'बुमरो' नृत्य से बचपन का सपना पूरा किया।

Web Summary : मराठी अभिनेत्री विदिशा म्हस्कर का कश्मीर की डल झील में 'बुमरो' नृत्य वायरल हुआ। पारंपरिक पोशाक में, उन्होंने अपने बचपन का सपना पूरा किया, और अपने मोहक प्रदर्शन और कश्मीरी रूप से प्रशंसकों को मोहित किया। वह वर्तमान में 'पिंगा गा पोरी पिंगा' में मुख्य भूमिका निभा रही हैं।

Web Title : Vidisha Mhaskar fulfills childhood dream with 'Bumro' dance in Kashmir.

Web Summary : Marathi actress Vidisha Mhaskar's 'Bumro' dance video in Kashmir's Dal Lake went viral. Donning traditional attire, she fulfilled her childhood dream, captivating fans with her graceful performance and Kashmiri look. She is currently playing a lead role in 'Pinga Ga Pori Pinga'.