VIDEO : सात वर्षाचा मुलगा असले (XXX) प्रश्न विचारतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 15:32 IST2016-07-03T10:02:13+5:302016-07-03T15:32:13+5:30

बॉलिवूडमध्ये नेहमी एखाद्या विषयाला हटके स्वरुपात मांडणाºया ‘यशराज फिल्म्स’ने अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत.

VIDEO: When a question asks for (XXX) a boy of seven years ... | VIDEO : सात वर्षाचा मुलगा असले (XXX) प्रश्न विचारतो तेव्हा...

VIDEO : सात वर्षाचा मुलगा असले (XXX) प्रश्न विचारतो तेव्हा...

लिवूडमध्ये नेहमी एखाद्या विषयाला हटके स्वरुपात मांडणाºया ‘यशराज फिल्म्स’ने अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. त्यातच आता मनोरंजन विश्वात काहीतरी हटके व तेवढेच महत्त्वपूर्ण देणाच्या प्रयत्नात ‘वाय फिल्म्स’ या बॅनरखाली ‘सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅन्ड पापा’ ही वेब सिरीज सध्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी तयार होत आहे. नेहमीच चर्चेपासून विसंगत असणाºया ‘सेक्स’ व त्यासारख्या इतर विषयांवर काहीशा विनोदी शैलीत भाष्य करणाºया या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. लहानग्यांमध्ये मोठ्यांच्या बोलण्याचालण्यातल्या विषयांचे कमालीचे कुतूहल, त्यातूनच त्यांना पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकांची उडणारी तारांबळ याचे धम्माल चित्रण या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘मुले कशी जन्माला येतात?, हस्तमैथुन म्हणजे काय? यांसारख्या प्रश्नांचा मारा करणारा चिमुरडा आणि त्याच्या या प्रश्नांनी घाम फुटलेले त्याचे पालक; अशी ओढाताण ही वेब सिरीज सादर करणार आहे. मराठमोळ्या सचिन पिळगावकरसह बरेच टि.व्ही. कलाकार या वेब सिरीजमधून आपली भूमिका साकारणार आहेत.

Web Title: VIDEO: When a question asks for (XXX) a boy of seven years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.