VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; अंकिता लोखंडेचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहचल्या सासूबाई, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 04:09 PM2024-03-22T16:09:35+5:302024-03-22T16:10:47+5:30

अंकिताच्या सासू रंजना जैन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

VIDEO: Vicky's mother Ranjana Jain reached the theater to watch Ankita Lokhande's Swatantra Veer Savarkar Movie | VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; अंकिता लोखंडेचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहचल्या सासूबाई, म्हणाल्या...

अंकिता लोखंडेचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहचल्या सासूबाई, म्हणाल्या...

अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकतेच अंकिताचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा २२ मार्च म्हणजेच आज प्रदर्शित झाला आहे. अंकिता या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमात तिनं विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीची अर्थात यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे. अशातच अंकिताचा हा सिनेमा पाहण्यासाठी तिच्या सासूबाई थिएटरमध्ये पोहचल्या. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी  'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहचल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलतानी त्यांनी अंकिताचं कौतुक केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पापराझींनी अंकिताच्या चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, 'अंकिता खूप छान आहे. ती ए वन आहे. त्यावर पापराझींनी पुन्हा विचारले की, 'तुम्हाला हवी होती तशीच सून मिळाली ना?', त्यावर अंकिताच्या सासूने उत्तर दिलं, 'हो, अगदी जशी हवी होती तशीच सून मिळाली आहे'. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अंकिता पती विकी जैनसोबत जेव्हा बिग बॉसच्या घरात सहभागी झाली होती. तेव्हा तिच्या सासूबाई जोरादर चर्चेत आल्या होत्या.  बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिता यांची भांडणं होतं होती. तेव्हा विकीच्या आईनं बिग बॉसच्या घरात येऊन अंकिता आणि विकीला भांडणं न करण्याचा सल्ला दिला होता. पण, त्यांचा सल्ला अंकिताच्या चाहत्यांना पटला नव्हता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या एका प्रोमोला कमेंट करुन अनेक नेटकरी विकीच्या आईला ट्रोल केलं होतं.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात अभिनेता रणदीप हुडा यानं मुख्य भूमिका अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमा दिग्दर्शनही रणदीपचंच आहे. या भूमिकेबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, यमुनाबाई या एक सशक्त महिला होत्या. त्यांची भूमिका साकारल्याचा आनंद आहे. तर शूटिंगच्या आधीच रणदीप हुडा यानं माझ्या चेहऱ्यावर अजिबातच मेकअप नसणार, हे स्पष्ट केलं होतं.
 

Web Title: VIDEO: Vicky's mother Ranjana Jain reached the theater to watch Ankita Lokhande's Swatantra Veer Savarkar Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.