Video: ड्रामा क्विन राखी सावंतचा ‘सोळा शृंगार’ ड्रामा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:40 IST2019-02-06T15:39:21+5:302019-02-06T15:40:22+5:30

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत दरवेळी असे काही करते की, लगेच चर्चेत येते. तिचा नवा ‘ड्रामा’ही असाच. अलीकडे राखी सावंत कुंभमेळ्यात पोहचली. पण हे काय, तिला पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

Video: rakhi sawant reached kumbh mela she wear sindoor, bindi | Video: ड्रामा क्विन राखी सावंतचा ‘सोळा शृंगार’ ड्रामा! 

Video: ड्रामा क्विन राखी सावंतचा ‘सोळा शृंगार’ ड्रामा! 

ठळक मुद्देमध्यंतरी दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचे राखीने जाहिर केले होते. अगदी या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर शेअर केली होती.

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत दरवेळी असे काही करते की, लगेच चर्चेत येते. तिचा नवा ‘ड्रामा’ही असाच. अलीकडे राखी सावंत कुंभमेळ्यात पोहचली. पण हे काय, तिला पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, राखीच्या भांगेत चक्क कुंकू होते.  अंगावर साडी, भांगेत कुंकू, हातात लाल चुडा अशा अवतारात राखी कुंभमेळ्यात पोहचली. तिला पाहून सगळेच अवाक् झालेत. पत्रकारही तिचा हा अवतार पाहून चक्रावले. मग काय, कुणाच्या नावाचे कुंकू लावून कुंभस्रानासाठी आली? असा प्रश्न तिला विचारला गेला. यावर राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. मी विवाहित नाही. अविवाहित आहे. पण तरीही सोळा शृृंगार करून कुंभमेळ्यात आलीय, असे तिने सांगितले. मी कुंभमेळ्याबद्दल खूप काही ऐकले होते. येथे येण्याची मनापासून इच्छा होती. पण गर्दीमुळे मी घाबरायचे. पण यावेळी पायलट बाबांचे निमंत्रण मिळाले आणि मी कुंभमेळ्यात आले, असे तिने सांगितले.


या कुंभमेळ्यातील अनेक व्हिडिओ राखीने आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. मी माझे पाप धुवायला आलीय, असे ती एका व्हिडिओत म्हणताना दिसतेय. आता राखीची किती  पापं धुतली गेलीयत, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण तिचा सोळा शृंगाराचा ‘ड्रामा’ मात्र हिट झालाय.


मध्यंतरी दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचे राखीने जाहिर केले होते. अगदी या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर शेअर केली होती. पण नेहमीप्रमाणे हाही तिचा ‘पब्लिसिटी स्टंट’ होता. एकंदर काय तर दीपक व राखीचे लग्न लोकांना पाहता आले नाही. पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने का होईना तिचा नववधू अवतार मात्र दिसला. 

Web Title: Video: rakhi sawant reached kumbh mela she wear sindoor, bindi