Video : राखी सावंत ढसा ढसा रडली...! लोकांनी म्हटले ‘नौटंकी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 12:32 IST2018-03-01T07:02:09+5:302018-03-01T12:32:09+5:30

श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड पोहोचले. सर्वांनी सोशल मीडियावर आपआपल्या पद्धतीने दु:ख व्यक्त केले. शोक संवेदना लिहिल्या. ड्रामा क्वीन राखी सावंत ही सुद्धा यापैकी एक़.

Video: Rakhi Sawant Dhaska bursts cry ...! People said 'gimmick'! | Video : राखी सावंत ढसा ढसा रडली...! लोकांनी म्हटले ‘नौटंकी’!

Video : राखी सावंत ढसा ढसा रडली...! लोकांनी म्हटले ‘नौटंकी’!

रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड पोहोचले. सर्वांनी सोशल मीडियावर आपआपल्या पद्धतीने दु:ख व्यक्त केले. शोक संवेदना लिहिल्या. ड्रामा क्वीन राखी सावंत ही सुद्धा यापैकी एक़. श्रीदेवींच्या निधनाची बातमी ऐकताच राखीला अश्रू आवरणे कठीण झाले. ती ढसा ढसा रडली. मुख्य म्हणजे, रडतांनाचा  व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. सध्या तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. पण नेहमीप्रमाणे या व्हिडिओवरूनही राखीला ट्रोल व्हावे लागतेय. ‘श्रीदेवी मॅम, क्या हो गया आपको? आप क्यों चले गये. आपके जैसा कोई नहीं है. मेरा जीने का दिल ही नहीं कर राहा है. आय लव्ह यू सो मच...’असे राखी या व्हिडिओत म्हणतेय आणि सोबत सोबत हमसून हमसून रडतेय. 



ALSO READ : किसिंग सीनसाठी राखी सावंतला घ्यावे लागले ५५ रिटेक; मिका सिंगची आली आठवण!

राखीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी तिचे सांत्वन केले आहे. पण अनेकांनी तिचा हा व्हिडिओ ‘ड्रामा’ ठरवला आहे. या व्हिडिओवरून लोकांनी राखीला अश्लाघ्य भाषेत ट्रोल केले आहे. काहींनी राखीला ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान’ म्हटले आहे तर काहींनी ‘नौटंकी’ म्हटले आहे. अद्याप राखी  ट्रोलर्सच्या या प्रतिक्रियांवर काहीही बोलली नाही. कदाचित आताश: राखीलाही या सगळ्यांची सवय झाली असावी. कदाचित अशा काही गोष्टी करून सतत चर्चेत राहणे, हेही तिला आवडू लागले असावे. कारण वाद आणि टीका ही राखीच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे.
अलीकडे राखीने एमटीव्ही बीसीएलमध्ये गोंधळ घालत चक्क अम्पायरवर भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. एकता कपूर आणि आनंद मिश्राच्या गोवा किलर संघाकडून खेळत असलेल्या राखी सावंतने अम्पायरवर आरोपांच्या अक्षरश: फैरी झाडल्या होत्या. 
 

Web Title: Video: Rakhi Sawant Dhaska bursts cry ...! People said 'gimmick'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.