VIDEO : राधिकाच्या ‘पार्च्ड’चा ट्रेलर रिलीज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 11:43 IST2016-09-13T06:13:24+5:302016-09-13T11:43:24+5:30
पॉर्न चित्रपट म्हणून ज्या चित्रपटाच्या कॉपी विकल्या गेल्या त्या बहुचर्चित राधिका आपटेच्या ‘पार्च्ड’ चित्रपटाचा आॅफिशियली ट्रेलर.........
.jpg)
VIDEO : राधिकाच्या ‘पार्च्ड’चा ट्रेलर रिलीज !
महिला गावातील परंपरा तोडण्यासाठी कशा झटतात, ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. भारतातील महिलांच्या समस्यांवर या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या सिनेमात आदिल हुसैन यांचीही भूमिका आहे.
अभिनेता अजय देवगनने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. 23 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक देशांत आतापर्यंत हा सिनेमा रिलीज झाला असून विविध 18 पुरस्कार या सिनेमाने पटकावले आहेत.