Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 11:35 IST2018-08-06T11:31:50+5:302018-08-06T11:35:51+5:30

कंगना राणौतचा आगामी सिनेमा मणिकर्णिकाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. कंगनाला या सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. यासिनेमाशी संबंधीत अजून काही खास माहितीसमोर नाही आली आहे.

Video: Queen kangna ranaut seen doing horse riding before manikarnika | Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत कंगना अनेक स्टंट करताना दिसणार आहेयेत्या १५ ऑगस्टला या चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे

कंगना राणौतचा आगामी सिनेमा मणिकर्णिकाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. कंगनाला या सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. यासिनेमाशी संबंधीत अजून काही खास माहितीसमोर नाही आली आहे. टीझर रिलीज होण्याच्या आधी कंगनाचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. कंगनाने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मध्ये राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. यासिनेमात तिने घोडेस्वारीपासून तलवारबाजीपर्यंतचे सगळे प्रशिक्षण घेतले आहे.  


राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत कंगना अनेक स्टंट करताना दिसणार आहे. निर्मात्याला विश्वास आहे की प्रेक्षकांना ही सीन्स खूप आवडतील आणि प्रेक्षकांच्या नजरा कंगानवरुन हलणे अशक्य आहे. अंकिता लोखंडे यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाचा हा सिनेमा पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर येत्या १५ ऑगस्टला या चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे.


कंगनाच्या दुसऱ्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर ती सध्या 'मेंटल है क्या'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात ती राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करतेय. 'मेंटल है क्या' पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेंटल है क्या' सिनेमानंतर कंगना अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 'कबड्डी' खेळावर आधारित आहे. कंगना यात कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. जर ही माहिती खरी ठरली तर कंगना पहिल्यांदा स्क्रिनवर आईची भूमिका साकारताना दिसेल. 

Web Title: Video: Queen kangna ranaut seen doing horse riding before manikarnika