VIDEO: नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर माजवली खळबळ, पहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 18:05 IST2021-01-04T18:04:44+5:302021-01-04T18:05:34+5:30
बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असते.

VIDEO: नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर माजवली खळबळ, पहा हा व्हिडीओ
बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. आपल्या अभिनयापेक्षा डान्समुळेच नोरा चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर नोरा चांगलीच चर्चेत आलीय ते म्हणजे तिच्या हटके, सेक्सी लूकमुळे. नोराचा फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतो आहे. यात तिने ट्रान्सपरंट गाऊन परिधान केला आहे.
नोरा फतेहीने शेअर केलेल्या व्हिडीओत ती फोटोशूट करताना दिसते आहे. ट्रान्सपरंट गाऊनमध्ये नोराचा खूप ग्लॅमरस दिसते आहे. या ड्रेसमध्ये नोराची टोन्ड बॉडी स्पष्टपणे दिसत आहे.नोराच्या व्हिडिओमध्ये बियॉन्से आणि जय जेचं 'क्रेजी इन लव्ह' हे गाणं वाजत आहे. त्यातील नोराच्या अदा चाहत्यांची मने जिंकत आहे.
नोराचा हा पहिला व्हिडिओ आहे ज्यात ती डान्स करताना दिसत नाही आहे. पण तरीही तिच्या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नोरा रेमो डिसुझाच्या 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमात दिसली होती. त्यात ती वरूण धवन आणि श्रद्धा कपूरसोबत दिसली होती.तसेच ती अजय देवगनच्या आगामी सिनेमातही दिसणार आहे.
नोरा काही दिवसांपूर्वी इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये जज म्हणूनही दिसली होती. या शोमध्ये नोरा फतेही काही दिवसांसाठी मलायका अरोराच्या जागी आली होती. त्यासोबतच नोरा फतेहीचं 'नाच मेरी राणी' हे गाणंही सुपरहिट ठरलं आहे. या गाण्याला यूट्यूबवर रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत.