VIDEO:आयुष्यभर तुझी साथ निभावेन,रोमँटिक अंदाजात विराटची अनुष्काला प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 10:19 IST2017-10-21T04:45:33+5:302017-10-21T10:19:06+5:30
मध्यंतरी विराट अनुष्काने लग्न केल्याचंही कानावर पडलं होतं. मात्र त्या केवळ चर्चा असल्याचे निष्पन्न झालं. मात्र दोघांनीही एकमेकांवर असलेले प्रेम दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. आता पुन्हा एकदा विराट-अनुष्काची जोरदार चर्चा रंगली आहे.

VIDEO:आयुष्यभर तुझी साथ निभावेन,रोमँटिक अंदाजात विराटची अनुष्काला प्रेमाची कबुली
ट म इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नातं लपून राहिलेलं नाही. दोघांमधील प्रेमाच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळतात.दोघांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाऊन असो किंवा क्रिकेटवर्ल्ड दोन्ही ठिकाणी खुमासदारपणे रंगवल्या जातात.विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री सा-यांनीच पाहिली आहे. मध्यंतरी विराट अनुष्काने लग्न केल्याचंही कानावर पडलं होतं. मात्र त्या केवळ चर्चा असल्याचे निष्पन्न झालं. मात्र दोघांनीही एकमेकांवर असलेले प्रेम दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. आता पुन्हा एकदा विराट-अनुष्काची जोरदार चर्चा रंगली आहे. याला निमित्त ठरली आहे एका ब्रँडची जाहिरात. या जाहिरातीमध्ये विराट आणि अनुष्काची खास केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळत आहे. या जाहिरातीची जादू आणि विराट-अनुष्का या लव्हबर्ड्सची केमिस्ट्री अशी काही तुफान हिट ठरली आहे की अवघ्या अर्ध्या तासात या जाहिरातीने युट्यूबवर अनेक लाइक्स आणि व्हियूज मिळू लागले. दोघांमधील रिलेशिनशिपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या जाहिरातीमधील दोघांचा अंदाज, स्टाईल सारं काही त्यांच्या फॅन्ससाठी लक्षवेधी ठरत आहे. या जाहिरातीमधील विराट अनुष्काच्या घायाळ करणा-या अदा पाहून पुन्हा एकदा नव्या चर्चा रंगल्या आहेत. विराट आणि अनुष्काचं बॉडिंग, एकमेंकांवर असलेले प्रेम या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीमध्ये झळकलेली ही जोडी पुन्हा एकदा जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आली आहे आणि तेही एका खास अंदाजात.
ही जाहिरात विवाहसोहळ्याशी संबंध असल्यामुळे पुन्हा एकदा विराट-अनुष्काच्या अफेअर तसंच लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. विराट आणि अनुष्काने एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहिर कबुली आजवर कधीही दिलेली नाही. मात्र एकमेकांबद्दल असलेले प्रेम काही ते जगापासून लपवून ठेवू शकले नाहीत. विराट कोहलीची मॅच पाहण्यासाठी कधी अनुष्का थेट ऑस्ट्रेलियात पोहचली तर कधी विराट अनुष्काच्या सिनेमाच्या प्रिमीयर सोहळ्याला हजर झाला. नुकतंच सचिनच्या आयुष्यावरील सिनेमाचा प्रिमीयर असो किंवा कोणतीही बॉलिवूडची पार्टी विराट-अनुष्का एकत्र पाहायला मिळाले. यावेळी विराट आणि अनुष्का दोघंही एकमेकांची तितकीच काळजी घेताना पाहायला मिळाले. आता एका नव्या जाहिरातीमधील विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री भाव खाऊन जात आहे. आता या जाहिरातीप्रमाणेच विराट आणि अनुष्का रिअल लाइफमध्येही एकत्र यावे आणि रेशीमगाठीत अडकावं अशीच इच्छा दोघांच्याही फॅन्सची नक्कीच असणार.