Video: ​काय ‘ज्युनिअर अरोरा साहब’ बनून टीव्ही पतरण्यास सज्ज आहे कपिल शर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 12:19 IST2018-01-05T06:49:42+5:302018-01-05T12:19:42+5:30

‘फिरंगी’ आपटला पण कदाचित कपिल शर्माचा इरादा बुलंद आहे. होय, एका फ्लॉप चित्रपटानंतर कॉमेडियन व अ‍ॅक्टर कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्ही आपली दुसरी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज आहे.

Video: Kapil Sharma is ready to make the TV by becoming 'Junior Aurora Saheb'? | Video: ​काय ‘ज्युनिअर अरोरा साहब’ बनून टीव्ही पतरण्यास सज्ज आहे कपिल शर्मा?

Video: ​काय ‘ज्युनिअर अरोरा साहब’ बनून टीव्ही पतरण्यास सज्ज आहे कपिल शर्मा?

िरंगी’ आपटला पण कदाचित कपिल शर्माचा इरादा बुलंद आहे. होय, एका फ्लॉप चित्रपटानंतर कॉमेडियन व अ‍ॅक्टर कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्ही आपली दुसरी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज आहे. कपिलने आपल्या सोशल अकाऊंटवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे.  यातील कपिलचे लूक चांगलेच मजेशीर आहे. ‘ज्युनिअर अरोरा साहब’ नावाने कपिलने शेअर केलेला हा व्हिडिओ त्याच्या वापसीचे संकेत मानला जात आहे. यापूर्वी ‘फिरंगी’च्या प्रमोशनदरम्यान कपिलने आपल्या वापसीचे संकेत दिले होते. नव्या वर्षात एका नव्या शोसह मी टीव्हीवर परत येईल, असे कपिल म्हणाला होता. या शोचे प्रोमो शूट केले जात असल्याचेही सांगितले गेले होते. कदाचित कपिलने शेअर केलेला हा ताजा व्हिडिओ त्याच्या याच प्रोमो शूटचा भाग असल्याचे वाटत आहे. अर्थात तूर्तास कपिलने या व्हिडिओबद्दल आणि आपल्या कमबॅक शोबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. सूत्रांचे मानाल तर कपिलच्या या कमबॅक शोमध्ये त्याचे अनेक जुने सहकलाकारही त्याच्यासोबत दिसतील. ही बातमी खरी असेल तर कपिलसोबत सुनील ग्रोव्हर परततो का, हे पाहणेही इंटरेस्टिंग ठरणार आहे.



 ‘फिरंगी’च्या अपयशानंतर कपिलचा हा नवा शो यशस्वी होईल की नाही, याबाबत तूर्तास वेगवेगळे तर्क बोलले जात आहेत. यापूर्वीच्या कपिलच्या शोमध्ये बॉलिवूडचे बडे बडे दिग्गज हजेरी लावतांना दिसले. पण एकवेळ अशी आली, जेव्हा कपिलने शाहरूख खान, अमिताभ बच्चन, अजय देवगण अशा दिग्गजासोबतचे शूट ऐनवेळी रद्द केले. यावरून बºयाच चर्चा रंगल्या. कपिलच्या या अशा वागण्यावर अनेकांनी टीकाही केली.  या सगळ्याचा कपिलच्या नव्या शोवर याचा कसा परिणाम दिसतो, ते येत्या काळात दिसणार आहे.

ALSO READ : ​कपिल शर्मा सांगतोय, या गोष्टीमुळे झाला फिरंगी फ्लॉप

आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला होता. सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला होता. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला आजारपणाने (?) घेरले होते. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले होते.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला होता.

Web Title: Video: Kapil Sharma is ready to make the TV by becoming 'Junior Aurora Saheb'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.