Video: 'मुंबईत आलो तेव्हा एकटा होतो, हा व्यक्ती मदतीला आला', शाहरुखने केले कौतुक, कोण आहे तो..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 02:44 PM2023-03-20T14:44:58+5:302023-03-20T14:46:39+5:30

मुंबईला आल्यानंतर शाहरुख एकटा पडला होता, त्याच्याकडे कामही नव्हते. तेव्हा हा खास मित्र मदतीला धावून आला.

Video: 'I was lonely when I came to Mumbai, sanjay dutt came to help', SRK praised | Video: 'मुंबईत आलो तेव्हा एकटा होतो, हा व्यक्ती मदतीला आला', शाहरुखने केले कौतुक, कोण आहे तो..?

Video: 'मुंबईत आलो तेव्हा एकटा होतो, हा व्यक्ती मदतीला आला', शाहरुखने केले कौतुक, कोण आहे तो..?

googlenewsNext

Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटातून दमदार कमबॅक केले. चित्रपट सुपरहिट झाल्यापासून शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलिकडेच अलाना पांडेच्या लग्नात पत्नी गौरीसोबतच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो एका खास व्यक्तीचे कौतुक करतोय. 

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) एका टॉक शो मध्ये सहभागी झाले होते. त्याच शोमधील व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओत शाहरुख मायानगरी मुंबईतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांना आठवतोय. मुंबईत आल्यानंतर काही दिवसांनी त्याचे कोणाशी तरी भांडण झाले होते. त्यावेळी तो मुंबईतील कोणाच्याही जवळ नव्हता. जेव्हा तो एकटा पडला होता, तेव्हा संजय दत्त त्याच्या मदतीसाठी पुढे आला होता. तुला कोणी हात लावला तर मला सांग, मी पाहून घेतो, असं म्हणणारा संजय दत्त होता, अशी माहिती शाहरुख देतो.

व्हिडिओमध्ये संजय दत्तही दिसत आहे, जो शाहरुखचे बोलणे ऐकून हसतोय. शाहरुख पुढे असेही म्हणतो की, मी त्यावेळी मुंबईत नवीन होतो आणि मला मदत करायला कोणीही येत नव्हते. अशा परिस्थितीत संजय दत्तने पुढे जाऊन मदत केली, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटात संजय दत्तदेखील दिसणार आहे. 'पठाण'ने मोठ्या पडद्यावर धमाकेदार कामगिरी केल्यानंतर चाहत्यांना शाहरुख खानच्या आगामी 'जवान' आणि 'डंकी'कडून खूप अपेक्षा आहेत.

Web Title: Video: 'I was lonely when I came to Mumbai, sanjay dutt came to help', SRK praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.