थाटच न्यारा! इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:59 IST2024-01-12T12:52:55+5:302024-01-12T12:59:13+5:30

 देशातच नाही तर विदेशातही इम्रानचे चाहते आहेत.

Video: Emraan Hashmi buys Rolls-Royce worth Rs 12.25 crore | थाटच न्यारा! इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

थाटच न्यारा! इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

 बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणार अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. त्यानं आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी इम्रान एक आहे.  देशातच नाही तर विदेशातही इम्रानचे चाहते आहेत. त्यात मुलींची संख्या आजही सर्वाधिक आहे. अलीकडेच त्याने 'टायगर ३' चित्रपटात सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे. याला कारणही तेवढचं खास आहे. इम्रान हाश्मीने भारतातील सर्वात महागडी कार खरेदी केली आहे.  

इम्रान हाश्मीने काळ्या रंगाची 'रोल्स रॉयस' ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 12.25 कोटी रुपये आहे. त्याच्या या गाडीची झलकही समोर आली आहे. समोर आलेल्या व्हिडीओत इम्रान हा नव्या आलिशान कारमध्ये अगदी रुबाबात बसल्याचे पाहायला मिळत आहे. इम्रानचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर  तुफान व्हायरल होत आहे. यावर त्याच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

इम्रान हाश्मी कारचा शौकीन आहे. आलिशान कारच्या कलेक्शनसाठी तो ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. रोल्स रॉयस ही कार खरेदी करण्यापूर्वी  इम्रानकडे लॅम्बोर्गिनी हुराकन, लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज मेबॅक एस560, ऑडी ए8 एल या महागड्या कार आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर इम्रान हाश्मी लवकरच 'डॉन 3'मध्ये रणवीर सिंगला टक्कर देताना दिसणार आहे. 

Web Title: Video: Emraan Hashmi buys Rolls-Royce worth Rs 12.25 crore