Video Alert : ​सलमान खानच्या छोट्या मित्राचा हा व्हिडिओ तु्म्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 12:15 IST2017-06-23T06:45:01+5:302017-06-23T12:15:01+5:30

सलमान खानने मार्टिनचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे. कारण हा मार्टिनच्या आॅडिशनचा व्हिडिओ आहे.

Video Alert: Have you seen this video of a little friend of Salman Khan? | Video Alert : ​सलमान खानच्या छोट्या मित्राचा हा व्हिडिओ तु्म्ही पाहिलात का?

Video Alert : ​सलमान खानच्या छोट्या मित्राचा हा व्हिडिओ तु्म्ही पाहिलात का?

मान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. होय, ‘ट्यूबलाईट’ आज शुक्रवारी चित्रपटगृहांत रिलीज झालाय. या चित्रपटात अशा अनेक खास गोष्टी आहे, ज्यामुळे तुम्ही हा चित्रपट पाहण्यास तुम्ही उत्सुक व्हाल. सलमानच्या अभिनयापासून तर दोन भावांची हृदयस्पर्शी कथा, हा या चित्रपटाचा प्लस पॉर्इंट आहे. याशिवाय यातील प्रत्येक पात्र एकदम हटके आहे. चित्रपटात सर्वाधिक लक्ष आकर्षून घेणारे कुठले पात्र आहे, तर ते चिमुकला मार्टिन रे टंगू याचे.
‘ट्यूबलाईट’चा ट्रेलर आणि गाण्यात तुम्ही मार्टिनचा क्यूट अंदाज पाहिलाय. यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही मार्टिनने सगळ्यांची मने जिंकली होती. या चित्रपटात मार्टिनने एका चीनी मुलाची भूमिका वठवली आहे. या चीनी मुलाची लक्ष्मणशी (सलमान खान) चांगली मैत्री होते, असे यात दाखवले आहे.  
आम्ही याठिकाणी मार्टिनबद्दल इतके बोलतोय, कारण सलमान खानने  मार्टिनचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे. कारण हा मार्टिनच्या आॅडिशनचा व्हिडिओ आहे. मार्टिन अनेक मुलांसोबत ‘ट्यूबलाईट’साठी आॅडिशन देतोय, हे या व्हिडिओत दिसते.



चित्रपटाचे डायलॉग्स पाठ करणारा मार्टिन, सर्व मुलांसोबत डान्स करणारा मार्टिन, सर्वाधिक मार्मिक अशा एका सीनची प्रॅक्टिस करणारा मार्टिन पाहणे तुम्हाला नक्कीच आवडेल. अखेर या चित्रपटासाठी मार्टिनची निवड का झाली? याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून नक्की मिळेल, हे आम्ही दाव्यानिशी सांगतो.
तेव्हा बघा तर आणि आम्हाला सांगा, हा नन्हा मार्टिन तुम्हाला कसा वाटला ते? या चित्रपटात सलमानशिवाय सोहेल खान, दिवंगत अभिनेते ओमपुरी, चीनी अभिनेत्री झू झू प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: Video Alert: Have you seen this video of a little friend of Salman Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.