अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 14:16 IST2019-01-29T14:10:23+5:302019-01-29T14:16:59+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी ‘मामला कुछ और’ आहे. होय, अक्षय चर्चेत आलाय तो त्याच्या एका जुन्या व्हिडिओमुळे.

This Video of Akshay Kumar Claiming He Gets More Love in Pakistan Than Anywhere Else Is Going Viral | अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!!

अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!!

ठळक मुद्दे यापूर्वी अक्षयचा असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात अक्षय टोरंटो (कॅनडा)च्या एका इव्हेंटमध्ये बोलताना दिसला होता.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी ‘मामला कुछ और’ आहे. होय, अक्षय चर्चेत आलाय तो त्याच्या एका जुन्या व्हिडिओमुळे. अक्षयचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होतोय आणि यावरून अक्कीला नाही - नाही ते ऐकावे लागतेय.
हा व्हिडिओ अक्षयच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. यात अक्की पाकिस्तानात त्याच्या चित्रपटांना मिळणाऱ्या प्रेमाबद्दल बोलतोय. पाकिस्तानात माझे चित्रपट सर्वाधिक कमाई करतात. जितके प्रेम येथे मिळते, तितके प्रेम कदाचितचं अन्य कुठे मिळत असेल...असे अक्षय या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. म्हणायला हा व्हिडिओ जुना आहे. पण यावरून युजर्सची जशी नजर पडली तसे त्यांनी अक्कीला अक्षरश: झोडपून काढले. होय, व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींनी अक्षयला ‘मौकापरस्त’ अर्थात संधीसाधू म्हटले तर कुणी ‘देशद्रोही’ ठरवले.









तुम्हाला ठाऊक असेलचं की, अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. यापूर्वी अक्षयचा असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात अक्षय टोरंटो (कॅनडा)च्या एका इव्हेंटमध्ये बोलताना दिसला होता. टोरंटो माझ्या घरासारखे आहे. चित्रपटातून निवृत्ती घेतल्यानंतर मी याच शहरात स्थायिक होण्याचा विचार करतोय, असे तो या व्हिडिओत म्हणाला होता. यावरूनही अक्षय ट्रोल झाला होता.






अक्षयने सर्वाधिक देशभक्तीपर चित्रपटात काम केले आहे. तुम्हारे हवाले वतन साथियों, हॉलीडे, बेबी, एअरलिफ्ट, रूस्तम असे अनेक चित्रपट या यादीत आहेत. पण हे जुने व्हिडिओ पाहून लोक हे चित्रपटही विसरले. या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे, ते नक्की लिहा.

Web Title: This Video of Akshay Kumar Claiming He Gets More Love in Pakistan Than Anywhere Else Is Going Viral