Video: अभिनेता Jr NTR च्या चाहत्यांचा गोंधळ; 20 वर्षे जुना चित्रपट पाहतेवेळी सिनेमा हॉलमध्येच लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 02:23 PM2023-05-22T14:23:12+5:302023-05-22T14:24:08+5:30

SS राजामौली आणि Jr NTR चा 'सिम्हाद्री' चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला, यावेळी चाहत्यांनी सिनेमा हॉलमध्ये आग लावली.

Video: Actor Jr NTR's Fans set fire in cinema hall while watching a 20-year-old movie Simhadri | Video: अभिनेता Jr NTR च्या चाहत्यांचा गोंधळ; 20 वर्षे जुना चित्रपट पाहतेवेळी सिनेमा हॉलमध्येच लावली आग

Video: अभिनेता Jr NTR च्या चाहत्यांचा गोंधळ; 20 वर्षे जुना चित्रपट पाहतेवेळी सिनेमा हॉलमध्येच लावली आग

googlenewsNext

Jr NTR : गेल्या काही वर्षांपासून देशभरात दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका वाजत आहे. बाहुबली, कंतारा, केजीएफ, आरआरआर यांसारख्या चित्रपटांनी दक्षिणच नाही, तर उत्तर भारतातही बंकर कमाई केली आहे. दरम्यान, साऊथ सुपरस्टार Jr NTR ची देशभरात तगडी फॅन फॉलोइंग आहे. एनटीआरचा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. पण, कधीकधी याच क्रेझमुळे नको ती घटना घडू शकते.

एनटीआरने 20 मे रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनेक सिनेतारकांनी आणि चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर ज्युनियर एनटीआरच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा 20 वर्षे जुना चित्रपट 'सिम्हाद्री' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा चित्रपट पाहताना एनटीआरच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात प्रचंड गोंधळ घातला आणि सिनेमागृहाला आगही लावली.

पाहा व्हिडिओ:-

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी विजयवाडा येथील एका थिएटरमध्ये त्याचा 'सिम्हाद्री' चित्रपट सुरू होता, यावेळी चाहत्यांनी फटाके फोडून आपल्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस सिनेमागृहात साजरा. यामुळे सिनेमा हॉलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत हॉलमधील काही सीटचे नुकसान झाले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे.

Web Title: Video: Actor Jr NTR's Fans set fire in cinema hall while watching a 20-year-old movie Simhadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.