कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:53 IST2025-11-08T13:51:31+5:302025-11-08T13:53:27+5:30
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लग्नाच्या ४ वर्षांनंतर हे दोघे पालक झाले आहेत. ही आनंदाची बातमी शुक्रवारी अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली.

कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लग्नाच्या ४ वर्षांनंतर हे दोघे पालक झाले आहेत. ही आनंदाची बातमी शुक्रवारी अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली होती. ७ नोव्हेंबरला अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. दीपिका पादुकोणपासून ते प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर खानपर्यंत अनेकांनी कतरिना आणि विकीला पालक झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सनी कौशलनेदेखील 'काका' बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. आता आजोबा शाम कौशल यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
विकी कौशलचे वडील आणि कतरिनाच्या सासऱ्यांनी म्हणजेच शाम कौशल यांनी आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट शेअर करून देवाचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, "शुक्रिया रब दा (देवाचे आभार). कालपासून देव माझ्या कुटुंबावर इतका मेहरबान राहिला आहे की, मी जितके आभार मानू, ते त्यांच्या आशीर्वादासमोर कमी पडत आहेत. देव खूप दयाळू आहे. देवाची कृपा अशीच माझ्या मुलांवर आणि सर्वात 'ज्युनियर कौशल'वर कायम राहो. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत आणि स्वतःला खूप भाग्यवान समजत आहोत. आजोबा बनून खूप-खूप आनंद झाला आहे. देव सर्वांवर कृपा करो. देव रक्षण करो."
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी शुक्रवारी आई-वडील बनल्याची घोषणा केली होती. ४२ वर्षीय अभिनेत्री आई बनल्यानंतर सोशल मीडियावर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. या जोडप्याने डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. ज्याप्रमाणे त्यांनी आपले डेटिंग लाईफ लपवून ठेवले होते, त्याचप्रमाणे त्यांनी प्रेग्नेंसी देखील लाइमलाइटपासून दूर ठेवली होती. त्यांनी सप्टेंबर महिन्यातच गर्भधारणेची घोषणा केली होती. आता चाहत्यांना त्यांच्या बाळाचे नाव आणि फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे.