LMOTY 2026: "महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रामुळेच..." 'छावा'साठी पुरस्कार मिळताच विकी कौशलची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:03 IST2026-03-11T15:02:43+5:302026-03-11T15:03:03+5:30
विकीनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

LMOTY 2026: "महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रामुळेच..." 'छावा'साठी पुरस्कार मिळताच विकी कौशलची भावुक पोस्ट
Maharashtrian of The Year Awards 2026 : विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. सिनेमातील विकीने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. नुकतंच काल १० मार्च रोजी 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पार पडलेल्या सोहळ्यात विकीला यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता' हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर विकीनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
विकीनं 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' सोहळ्यातील खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले. यासोबत त्यानं लिहलं, "महाराष्ट्रासाठी… आणि महाराष्ट्रामुळेच... 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा केवळ एक पुरस्कार नाही, तर त्याहूनही मोठा सन्मान वाटतो. 'छावा'ची कथा ही महाराष्ट्राच्या मातीची आणि ती इथल्या लोकांचीच आहे. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद- माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. मनापासून धन्यवाद, महाराष्ट्र!". विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय.
दरम्यान, काल कार्यक्रमात विकीनं पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आल्यावर मराठी भाषेतून संवाद साधून प्रेक्षकांचे आभार मानले. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता' या सन्मानासाठी लोकमत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. विशेष म्हणजे विकीनं स्टेजवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करत, "देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था!" ही गर्जना केली. विकीच्या या कृतीने सर्वजण थक्क झाले.