विकी कौशलच्या 'उरी'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 13:36 IST2018-12-01T13:35:21+5:302018-12-01T13:36:00+5:30

अभिनेता विकी कौशलचा उरी सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वीच आऊट झाला होता.

vicky kaushal Uri' trailer will be released on this day | विकी कौशलच्या 'उरी'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

विकी कौशलच्या 'उरी'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

ठळक मुद्दे'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहेयात विकी कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुखे भूमिका आहे

अभिनेता विकी कौशलचाउरी सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वीच आऊट झाला होता. आता 5 डिसेंबरला ट्रेलर रिलीज होणार आहे.   

 

 

 



विकी कौशलने ट्विटरवरुन याची माहिती दिली. जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' सिनेमा आहे. 

यात विकी कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुखे भूमिका आहे. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. या सिनेमाचे अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत देखील झाली होती.

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण उरी अॅटॅकनंतर प्रत्येक जणांना वाटत होते की पाकिस्तानलाही तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी संपूर्ण भारताने जवानांचे कौतूक केले होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने 'मसान', 'राझी', 'संजू' आणि अलिकेडेच रिलीज झालेल्या 'मनमर्जियां', या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. 
 

Web Title: vicky kaushal Uri' trailer will be released on this day