अन् विकी कौशल ठरला अग्रेसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 21:00 IST2019-02-21T21:00:00+5:302019-02-21T21:00:00+5:30
२०१९च्या सुरूवातीला लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत ३४व्या स्थानी असलेला विकी आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

अन् विकी कौशल ठरला अग्रेसर
विकी कौशलच्या ‘हाऊज दी जोश’ या डायलॉगमुळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंगमध्येही वाढता जोश दिसून येतो आहे. २०१८ मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामूळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या उरी चित्रपटाने तर कमालच केली. विकी कौशल रातोरात स्टार झाला.
यंदा ११ जानेवारीला रिलीज झालेला उरी चित्रपट संपूर्ण महिनाभर बॉक्स ऑफिसवर आपली चांगली घोडदौड करत होता. याचा अर्थातच फायदा विकीच्या लोकप्रियतेत झाला. २०१९च्या सुरूवातीला लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत ३४व्या स्थानी असलेला विकी आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
स्कोअर ट्रेंड्स इंडियाच्या गेल्या ४५ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, ३ जानेवारी २०१९ला विकी कौशल ३४व्या स्थानावर होता. तर उरी चित्रपटाच्या रिलीजच्या आठवड्यात म्हणजेच १० जानेवारी ते १७ जानेवारीच्या आठवड्यात पाचव्या स्थानावर पोहोचला होता. ज्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत बरेच चढउतार दिसले. त्यानंतर पुन्हा १४ फेब्रुवारीच्या आठवड्यात उरी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या प्रतिसादामुळे विकी लोकप्रियतेत सहाव्या स्थानावर आला.
स्कोअर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “विकीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या उरी चित्रपटामुळे त्याच्या यशात आणि चाहत्यांच्या प्रेमात एवढी वाढ झाली की त्याच्याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डिजिटल न्यूज आणि प्रिंट न्यूजमध्ये खूप लिहीले आणि चर्चिले जात होते. गेल्या वर्षी आलेल्या सिनेमांमूळे विकी कौशल एक चांगला अभिनेता आहे, हे सिद्ध झालेच होते. पण २०१९ वर्षाने विकीला स्टारपण बहाल केले, असे म्हणावे लागेल. “