Animal अन् सॅम बहादुरच्या क्लॅशवर विकी कौशलची प्रतिक्रिया, चाहत्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:05 PM2023-10-14T12:05:07+5:302023-10-14T12:06:25+5:30

१ डिसेंबर शुक्रवारी 'एनिमल' आणि 'सॅम बहादुर' थिएटरमध्ये धडकतील.

vicky kaushal opens up on animal and sam bahadur clash on december 1 | Animal अन् सॅम बहादुरच्या क्लॅशवर विकी कौशलची प्रतिक्रिया, चाहत्यांनी केलं कौतुक

Animal अन् सॅम बहादुरच्या क्लॅशवर विकी कौशलची प्रतिक्रिया, चाहत्यांनी केलं कौतुक

येत्या काही दिवसात बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांचे क्लॅश बघायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रणबीर कपूरचा 'एनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा 'सॅम बहादुर'(Sam Bahadur) . दोन्ही चित्रपट १ डिसेंबर रोजीच प्रदर्शित होणार आहेत. दोघांचा वेगळा चाहतावर्ग आहे. त्यामुळे कोणता सिनेमा बाजी मारणार ही स्पर्धा होणार हे साहजिकच आहे. मात्र सिनेमांच्या या क्लॅशबाबत विकी कौशलने (Vicky Kaushal) मोठं वक्तव्य केलंय. त्याचं उत्तर ऐकून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

१ डिसेंबर शुक्रवारी 'एनिमल' आणि 'सॅम बहादुर' थिएटरमध्ये धडकतील. हा दिवस आमच्यापेक्षा जास्त प्रेक्षकांचा असेल. आजकाल एकाच दिवशी अनेक सिनेमांचा लाभ प्रेक्षकांना घेता येत आहे. यामुळे इंडस्ट्रीही बहरत आहे, असं मत विकी कौशलने व्यक्त केलं. 'सॅम बहादुर' सिनेमाच्या टीझर लाँचवेळी तो म्हणाला,'आपल्याला असा माहोल तयार करावा लागेल की एकाच दिवशी रिलीज झालेले सर्व चित्रपट चांगली कमाई करतील.आपल्याकडे प्रेक्षक, एक्झिबिटरच्या रुपाने ताकद आहे मग का नाही? आपल्याला आता स्वत:साठी बेंचमार्क सेट करावे लागतील. आजकाल प्रेक्षकांमध्ये जो उत्साह आहे हे पाहून जर दोन्ही सिनेमात दम असेल तर दोन्ही नक्कीच चालतील.'

तो पुढे म्हणाला,'मी सुद्धा एनिमलसाठी आतुर आहे जितके बाकी लोक आहेत. आम्ही स्वत:साठी नाही तर प्रेक्षकांसाठी काम करतो. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये योग्यता असेल तर ते दोन्ही चालतील जे की प्रेक्षकांवरच अवलंबून आहे.'

पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहुर्तावर सलमान खानचा 'टायगर 3' देखील रिलीज होत आहे. सलमानचे चाहते तर सिनेमाची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करत आहेत. तर दुसरीकडे डिसेंबर महिन्यात शाहरुख खान 'डंकी' या आणखी एका सिनेमाचं वादळ घेऊन येत आहे. तर त्याच दिवशी प्रभासचा 'सालार' रिलीज होणार अशी चर्चा आहे. ८ डिसेंबरला कतरिना कैफ आणि विजय सेतुपतिचा 'मेरी ख्रिसमस' रिलीज होत आहे.सध्या बॉलिवूड जोरात आहे.

Web Title: vicky kaushal opens up on animal and sam bahadur clash on december 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.