VIDEO: विकी कौशलच्या मागे लागली फीमेल फॅन, कोरोनातही करावी लागली इच्छा पूर्ण...
By अमित इंगोले | Updated: October 29, 2020 13:20 IST2020-10-29T13:19:18+5:302020-10-29T13:20:46+5:30
नुकताच रस्त्यावर याचा एक पुरावा बघायला मिळाला. कोरोनाच्या या काळातही एका फीमेल फॅनने त्याला सेल्फीसाठी मनवलं. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO: विकी कौशलच्या मागे लागली फीमेल फॅन, कोरोनातही करावी लागली इच्छा पूर्ण...
विकी कौशलनेबॉलिवूडमध्ये आपली जागा मजबूत तयार केली आहे. विकीची फॅन फॉलोइंगही भरपूर आहे. खासकरून तरूणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. नुकताच रस्त्यावर याचा एक पुरावा बघायला मिळाला. कोरोनाच्या या काळातही एका फीमेल फॅनने त्याला सेल्फीसाठी मनवलं. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विकी कौशलला रस्त्यावर पाहून एक तरूणी त्याला सेल्फीसाठी कन्वेन्स करते. विकी सुद्धा मास्क काढून सेल्फी क्लिक काढतो. पण फोटो सेव्ह न झाल्याने ती तरूणी पुन्हा त्याच्याकडे सेल्फीसाठी हट्ट करते.
विकी कौशल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव आहे. नुकताच त्याने त्याच्या वर्कआउटचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात त्याची जबरदस्त बॉडी दिसत होती. फॅन्स याला नव्या सिनेमाची तयारी मानत आहेत. विकी कौशलचा 'सरदार उधम सिंह' हा सिनेमा यावर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज पुढील वर्षी होणार आहे. तसेच विकी करण जोहरच्या 'तख्त' सिनेमातही दिसणार आहे.
दरम्यान, विकी कौशलचं नाव ड्रग्स मुद्द्यावरून चर्चेत होतं. करण जोहरच्या ज्या पार्टी व्हिडीओवर ड्रग्सचा आरोप होता त्यात विकी कौशल नाकाला हात लावताना दिसला होता. त्यामुळे त्याने ड्रग्स घेतलं असा दावा केला जात होता. पण आता फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, करण जोहरच्या घरच्या पार्टीत कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सचा वापर केला गेला नाही.