‘एक्स- गर्लफ्रेन्ड’ म्हणताच भडकली हरलीन सेठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 16:36 IST2020-01-05T16:35:14+5:302020-01-05T16:36:39+5:30

‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळे एकीकडे विकी कौशल चर्चेत आला आणि दुसरीकडे अभिनेत्री हरलीन सेठी चर्चेत आली.

vicky kaushal ex-girlfriend harleen sethi got angry on entertainment website for calling her his Ex | ‘एक्स- गर्लफ्रेन्ड’ म्हणताच भडकली हरलीन सेठी!

‘एक्स- गर्लफ्रेन्ड’ म्हणताच भडकली हरलीन सेठी!

ठळक मुद्देहरलीन ही एक  अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट आहे.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळे एकीकडे विकी कौशल चर्चेत आला आणि दुसरीकडे अभिनेत्री हरलीन सेठी चर्चेत आली. होय, याच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी व हरलीन एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.
 त्याआधी बरेच दिवस हरलीन व विकीचा प्रेमाचा लपंडाव सुरु होता. पण अचानक हे दोघे बिनधास्तपणे एकमेकांसोबत फिरताना दिसू लागले. अगदी दोघे ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’चे एकत्र प्रमोशन करतानाही दिसले. पण काही महिन्यांनंतर अचानक या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पाठोपाठ अभिनेत्री कतरीना कैफ ही विकी व हरलीनच्या लव्हस्टोरीतील ‘विलेन’ ठरल्याच्याही चर्चा रंगल्या. मग काय यानंतर हरलीन सेठीला विकीची ‘गर्लफ्रेन्ड’ नाही तर विकीची ‘एक्स- गर्लफ्रेन्ड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पण ‘एक्स- गर्लफे्रन्ड’  म्हणणे हरलीनला अजिबात रूचले नाही आणि ती भडकली. होय, भडकली.


अलीकडे एका ऑनलाईन पोर्टलने कथितरित्या हरलीनचा एक व्हिडीओ पोस्ट केला. मात्र या व्हिडीओची हेडलाईन पाहून हरलीन भडकली. कारण या हेडलाईनमध्ये ‘विकीची एक्स- गर्लफ्रेन्ड’ असा हरलीनचा उल्लेख करण्यात आला होता.  हेडलाईन पाहून हरलीनचा पारा चढला आणि तिने  संबंधित ऑनलाईन पोर्टलला चांगलेच सुनावले.


हरलीन ही एक  अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट आहे. लव्ह बाईट्स, ब्रोकेन बट ब्युटिफुल अशा सीरिजमध्ये तिने काम केलेय. विकीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे हरलीन काही काळ डिप्रेशनमध्ये गेल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.  डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी हरलीन कुटुंबीयांसोबत जास्ती जास्त वेळ घालवतेय. 

Web Title: vicky kaushal ex-girlfriend harleen sethi got angry on entertainment website for calling her his Ex