विकी कौशल ठरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता', म्हणाला "महाराष्ट्राच्या लोकांचा हा आशिर्वाद"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 21:44 IST2026-03-10T21:13:55+5:302026-03-10T21:44:53+5:30

पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आल्यावर विकीने उपस्थितांची मने जिंकली.

Vicky Kaushal Awarded lokmat Maharashtrian Of The Year 2026 - Best Actor Chhava Movie Sambhaji Maharaj | विकी कौशल ठरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता', म्हणाला "महाराष्ट्राच्या लोकांचा हा आशिर्वाद"

विकी कौशल ठरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता', म्हणाला "महाराष्ट्राच्या लोकांचा हा आशिर्वाद"

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026 : आपल्या दमदार अभिनयाने आणि अष्टपैलू भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा लाडका अभिनेता विकी कौशल. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याने 'छावा' या ऐतिहासिक सिनेमात इतका दमदार अभिनय केला आहे की तो पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याचे कौतुक करताना दिसला. आता विकी कौशलला यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता' हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकीला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - अभिनेता' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आल्यावर विकीने उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्राची कर्मभूमी म्हणून आदराने उल्लेख करत त्याने मराठी भाषेतून संवाद साधून प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला, "सर्वांना माझा नमस्कार... तुम्ही म्हटलं मी महाराष्ट्रीय नाही. पण, माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. या सन्मानासाठी लोकमत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.  माझ्यासाठी हा फक्त पुरस्कार नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या लोकांचा आशिर्वाद आहे". 


पुढे तो म्हणाला, "छावा हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी एक खूप मोठी जबाबदारी होती. धैर्य, शोर्य, बलिदान, अभिमान या शब्दाचा खरा अर्थ या चित्रपटापासून मी समजलो आहे. याचे श्रेय मी माझ्या छावा चित्रपटाच्या टीमला देऊ इच्छितो. पण, याचं खर श्रेय मी देतो महाराष्ट्राला आणि जगात बसलेल्या प्रत्येक मराठी माणसाला". 

भाषणाच्या शेवटी विकीने  छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करत,  "देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था!" ही गर्जना केली.  यावेळी त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली. 

Web Title : विक्की कौशल बने लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०२६ – अभिनेता

Web Summary : अपनी दमदार एक्टिंग के लिए मशहूर विक्की कौशल को लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०२६ का पुरस्कार मिला। उन्होंने यह पुरस्कार महाराष्ट्र की संस्कृति और लोगों को समर्पित किया और मराठी में आभार व्यक्त किया।

Web Title : Vicky Kaushal Named Lokmat Maharashtrian of the Year 2026 – Actor

Web Summary : Vicky Kaushal, celebrated for his powerful acting, received the Lokmat Maharashtrian of the Year 2026 award for Best Actor. He dedicated the award to Maharashtra's culture and people, acknowledging their blessings and expressing gratitude in Marathi at the Gateway of India ceremony.