Bad Newz: विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' वर सेन्सॉरची नजर, ३ सीन्समध्ये केले बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:08 IST2024-07-16T18:08:00+5:302024-07-16T18:08:58+5:30
विकी आणि तृप्ती दोघांमध्ये सिनेमात काही इटेन्स सीन्स आहेत.

Bad Newz: विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' वर सेन्सॉरची नजर, ३ सीन्समध्ये केले बदल
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांचा 'बॅड न्यूज' सिनेमा लवकरच रिलीज होतोय. सध्या सिनेमातील 'जानम' गाणं आलं आहे. गाण्यात विकी आणि तृप्तीचे इंटिमेट सीन्स चर्चेचा विषय आहेत. गाणंच असं असेल तर सिनेमात दोघांची काय केमिस्ट्री असेल याचाच विचार चाहते करत आहेत. दरम्यान सेन्सॉर बोर्डाने मात्र सिनेमातील काही सीन्सवर आधीच कात्री फिरवली आहे.
विकी आणि तृप्ती दोघांमध्ये सिनेमात काही इटेन्स सीन्स आहेत. दोघंही एकदम हॉट अवतारात दिसत आहेत. असे सीन्स म्हटलं की सेन्सॉर बोर्डाची नजर तर पडणारच. दरम्यान आता सिनेमातील काही इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली आहे. 'बॅड न्यूज'मध्ये काही बदल करण्यात आले असून यामुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
'बॉलिवूड हंगामा' रिपोर्टनुसार, सिनेमात कोणताही ऑडिओ कट केला गेलेला नाही. तसंच गाण्यातही कोणतेच बदल केलेले नाहीत. मात्र सिनेमातील तीन सीन्सवर कात्री फिरवली आहे ज्यात दोन किसींग सीन्स आहेत. ८,९ आणि १० सेंकदाच्या अशा एकूण २७ सेकंदातील तीन सीन्समध्ये हे बदल झाले आहेत. आता हे सीन्स तृप्ती आणि विकीचेच आहेत की तृप्ती आणि एमी विर्कचे हे समजलेले नाही. सोबतच 'बॅड न्यूज'ला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. सिनेमा २ तास २२ मिनिटांचा आहे.