ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:16 IST2025-11-11T07:14:28+5:302025-11-11T07:16:59+5:30
Dharmendra Health Update: श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, असे धर्मेंद्र यांच्या टीमने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई - श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, असे धर्मेंद्र यांच्या टीमने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आठवडा भरापासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, धर्मेंद्र यांच्या टीमने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
पुढील माहिती आणि अद्ययावत तपशील वेळोवेळी कळवले जातील. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हृदयविकारतज्ज्ञ डॉ. देव बी. पहलाजानी आणि अन्य वैद्यकीय शाखेचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.
धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयात असून, त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या मुली मंगळवारी सकाळी मुंबईत पाेहाेचतील. सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काहींनी हाॅस्पिटलला भेट देऊन देओल कुटुंबियांना या संकटातून मार्ग निघेल असा दिलासा दिला. सोमवारी सायंकाळी धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या. धमेंद्र यांना लवकर बरे वाटावे यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.
लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात भेट देऊन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माध्यमांशी बोलताना डॉ. दर्डा म्हणाले की, आम्ही त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते लवकर बरे होतील, अशी आम्हाला आशा आहे.