​ ‘वीरप्पन’ येतोयं.... ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 19:18 IST2016-04-18T13:48:56+5:302016-04-18T19:18:56+5:30

रामगोपाल वर्मा यांचा ‘वीरप्पन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कर्नाटकातील कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर आज आऊट झाला

'Veerappan' arrives .... trailer release | ​ ‘वीरप्पन’ येतोयं.... ट्रेलर रिलीज

​ ‘वीरप्पन’ येतोयं.... ट्रेलर रिलीज

मगोपाल वर्मा यांचा ‘वीरप्पन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कर्नाटकातील कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर आज आऊट झाला. रक्तरंजित घटनांनी भरलेल्या या ट्रेलरमध्ये जंगलातील भयावह घटना दिसत आहेत. निश्चितपणे हा ट्रेलर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सूकता वाढणारा आहे.नॅशनल स्कूल ड्रामाचा विद्यार्थी संदीप भारद्वाज याने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. तो यात वीरप्पनची भूमिका साकारत आहे. १८ आक्टोबर २००४ रोजी एसटीएफने कर्नाटक व तामिळनाडूच्या सीमेलगत असलेल्या जंगलात वीरप्पनला ठार केले होते. सचिन जोशी या चित्रपटाचे निर्माते आहेत तर रामगोपाल वर्मा दिग्दर्शक आहे. हा चित्रपट अनुराग कश्यप यांच्या ‘रमन राघव’सोबत येत्या मे मध्ये रिलीज होणार आहे.


Web Title: 'Veerappan' arrives .... trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.