वीर पहाडिया आणि तारा सुतारियाचं अखेर ब्रेकअप? नुपूर-स्टेबिनच्या रिसेप्शनला एकटाच पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:23 IST2026-01-14T11:21:47+5:302026-01-14T11:23:03+5:30

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे वीर पहाडिया आणि तारा सुतारिया.

Veer Pahariya Tara Sutaria Breakup Confirmed Actor Arrives Solo At Nupur Stebin Reception Amid Split Rumours | वीर पहाडिया आणि तारा सुतारियाचं अखेर ब्रेकअप? नुपूर-स्टेबिनच्या रिसेप्शनला एकटाच पोहोचला

वीर पहाडिया आणि तारा सुतारियाचं अखेर ब्रेकअप? नुपूर-स्टेबिनच्या रिसेप्शनला एकटाच पोहोचला

लोकप्रिय अभिनेत्री तारा सुतारिया आणि महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पाहाडिया हे सेलिब्रिटी कपल मागील काही दिवसांपासून सात्यत्याने चर्चेत आहेत. अलिकडेच तारा ही मुंबईमध्ये लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये बॉयफ्रेंड वीर पहाडियासोबत पोहोचली होती. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या दोघांची सगळीकडे चर्चा होऊ लागली. या कॉन्सर्टमध्ये घडल्या प्रकारानंतर वीर आणि ताराच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच एका नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे या ब्रेकअपच्या अफवांना अधिक बळकटी मिळाली आहे.

 १३ जानेवारी रोजी मुंबईत पार पडलेल्या नुपूर सनॉन आणि स्टेबिन बेन यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये वीर पहाडियाने एकट्याने हजेरी लावली. काळ्या रंगाच्या शर्ट आणि ट्राउझर्समध्ये वीर अत्यंत देखणा दिसत होता, पण त्याच्यासोबत तारा नसल्याने सर्वांच्या नजरा तिथेच खिळल्या. सहसा प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसणारी ही जोडी यावेळी एकत्र नसल्याने त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.


२०२५ मध्ये केलं होतं नातं जाहीर
तारा आणि वीर यांनी २०२५ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. विमानतळावरचे त्यांचे रोमँटिक फोटो आणि सोशल मीडियावरील एकमेकांसाठीच्या पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे.  वीर आणि ताराच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करणे टाळले आहे.
 

Web Title : तारा सुतारिया और वीर पहाड़िया का ब्रेकअप? रिसेप्शन में अकेले पहुंचे।

Web Summary : तारा सुतारिया और वीर पहाड़िया के अलग होने की अफवाहें हैं क्योंकि वह रिसेप्शन में अकेले पहुंचे। 2025 में अपने रिश्ते की पुष्टि करने वाले इस जोड़े ने हाल ही में एक साथ पोस्ट नहीं किया है, जिससे ब्रेकअप की अटकलें तेज हो गई हैं।

Web Title : Tara Sutaria and Veer Pahadiya break up? He attends reception solo.

Web Summary : Rumors suggest Tara Sutaria and Veer Pahadiya have split after he attended a reception alone. The couple, who confirmed their relationship in 2025, haven't posted together recently, fueling breakup speculation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.