'विक्रम वेधा'मधील 'वेधा' हृतिक रोशनच्या करिअरमधील ठरली माईलस्टोन भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:39 IST2022-12-15T19:38:47+5:302022-12-15T19:39:09+5:30
Hritik Roshan : हृतिक रोशनने 'विक्रम वेधा'मध्ये साकारलेला गँगस्टर रसिकांना खूपच भावला.

'विक्रम वेधा'मधील 'वेधा' हृतिक रोशनच्या करिअरमधील ठरली माईलस्टोन भूमिका!
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन(Hritik Roshan)चे चाहते त्याच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट पाहत असतात. अभिनेत्याचा २०१९ मध्ये वॉर चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्यानंतर विक्रम वेधा(Vikram Vedha)तून सुपरस्टारने एक नवीन कामगिरीचा बेंचमार्क सेट केला. यात हृतिकने साकारलेला गँगस्टर रसिकांना खूपच भावला. वेधाची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
हृतिक रोशनसाठी २०२२ हे वर्ष सर्वोत्कृष्ट ठरले आहे. वेधाच्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या भूमिकेचं सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. इतकेच नाही तर चित्रपट समीक्षकांनीदेखील अभिनेत्याची प्रशंसा केली. इंटरेस्टिंग बाब म्हणजे हृतिक रोशन हा एकमेव सुपरस्टार आहे, जो पिढ्यानपिढ्या ओळखला जातो आणि प्रतिष्ठित भूमिका साकारताना दिसतो. विजय सेतुपतीचा चर्चेत आलेल्या चित्रपटाच्या रिमेकमधील भूमिकेला हृतिक रोशनने आपल्या अभिनय कौशल्याने चारचाँद लावले आहेत.
हृतिक रोशनच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. हृतिकच्या अग्निपथ सिनेमाने केवळ भारतातील एका चित्रपटाचा सर्वाधिक ओपनिंग दिवसाचा विक्रम मोडला नाही आणि २०१२ मधील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा हिंदी चित्रपट म्हणून उदयास आला, परंतु अनेकांनी तो मूळ चित्रपटापेक्षा श्रेष्ठ असल्याचे मानले.
विक्रम वेधाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, हृतिक सध्या भारतातील पहिल्या एरियल अॅक्शन फिल्म फायटरसाठी शूटिंग करत आहे, जो सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.