"मेकअपसाठी शूटिंगच थांबवायची", वेदांग रैनाने सांगितला सुहाना खानसोबत काम करण्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:26 IST2024-10-09T14:25:33+5:302024-10-09T14:26:58+5:30

वैदांग रैना आगामी 'जिगरा' सिनेमात आलिया भटसोबत दिसणार आहे.

Vedang Raina talks about his working experience with suhana khan in the archies | "मेकअपसाठी शूटिंगच थांबवायची", वेदांग रैनाने सांगितला सुहाना खानसोबत काम करण्याचा अनुभव

"मेकअपसाठी शूटिंगच थांबवायची", वेदांग रैनाने सांगितला सुहाना खानसोबत काम करण्याचा अनुभव

'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वैदांग रैना (Vedang Raina)  सध्या चर्चेत आहे. आलिया भटसोबत तो आगामी 'जिगरा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो आलियाच्या भावाच्या भूमिकेत आहे. नुकतंच वेदांगने त्याच्या 'द आर्चीज' सिनेमाचा अनुभव सांगितला. यावेळी त्याने सुहाना खानचेही काही किस्से सांगितले.

'गलाटा इंडिया'ला इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वेदांग सुहाना खानबद्दल म्हणाला, "सुहाना तिच्या आजूबाजूच्या लोकांसमोर खूप छान वागते. समोरच्याला स्पेशल असल्याची जाणीव करुन देते. मला तिची ही गोष्ट खूप आवडते. मात्र ती तयार व्हायला खूप वेळ लावते. आम्ही मुलं १५ मिनिटात तयार व्हायचो. मग सुहानासाठी आम्हाला ४० मिनिटं वाट पाहायला लागायची. बरेचदा तर सुहानाची मेकअप टीम शूटिंग मध्येच थांबवायची. कारण तिचे केस खराब झालेत सेट करायचेत असं सांगत ते शूट थांबवायचे. आता यात तिचीही चूक नव्हती आणि कारण तिची भूमिकाच ग्लॅमरस होती."


यानंतर वेदांगला त्याची कथित गर्लफ्रेंड खुशी कपूरबद्दल विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, "खुशी सगळ्यांसोबत प्रेमाने आणि आदराने राहते. मात्र ती स्वत:ला खूप कमी लेखते हे मला आवडत नाही. ती खूप टॅलेंटेड आहे फक्त तिने स्वत:वर तेवढा विश्वास दाखवायला हवा."

वेदांग रैनाने 'जिगरा' मध्ये गाणंही गायलं आहे. ट्रेलरमधूनही त्याने लक्ष वेधून घेतलंय. त्याची आणि आलियाची भावा बहिणीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
 

Web Title: Vedang Raina talks about his working experience with suhana khan in the archies