जान्हवीनंतर आता खुशीच्या अफेअरच्या चर्चा, वेदांग रैना म्हणाला - 'खुशी आणि मी खूप...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:22 IST2023-12-29T19:18:59+5:302023-12-29T19:22:12+5:30

खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्या डेटिंगच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 

Vedang Raina confirms he is not dating Khushi Kapoor | जान्हवीनंतर आता खुशीच्या अफेअरच्या चर्चा, वेदांग रैना म्हणाला - 'खुशी आणि मी खूप...'

जान्हवीनंतर आता खुशीच्या अफेअरच्या चर्चा, वेदांग रैना म्हणाला - 'खुशी आणि मी खूप...'

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर ही बॉलीवूडमधील सर्वात हॉट स्टार किड्सपैकी एक आहे. तिनं अगस्त्य नंदा, सुहाना खान यांसारख्या कलाकारांसोबत 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यातच आता  खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्या डेटिंगच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 

'द आर्चीज' सिनेमात वेदांग आणि खुशी यांनी एकत्र काम केलं आहे. डेटिंगच्या बातम्यावर वैदांग म्हणाला, 'मी आणि खुशी खूप जवळचे मित्र आहोत. माझे तिच्याशी खूप घट्ट नाते आहे. आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो. पण, खुशी आणि मी डेटिंग करत नाही आहोत. मी सध्या सिंगल आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा नक्कीच परिस्थिती वेगळी असेल'. 

खुशी कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला वेदांगने हजेरी लावली होती. तेव्हापासूनच दोघांच्या डेटिंगच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. ओरहान अवत्रमनी उर्फ ओरी यानं त्याच्या इंस्टाग्राम शेअर केलेल्या एका स्टोरीमुळं खुशी आणि वेदांग यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

द आर्चिज या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर खुशी कपूरनं या सिनेमात बेट्टी हे पात्र साकारलं. ओटीटी प्लाटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा उपलब्ध आहे. या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे 'द आर्चिज' या लोकप्रिय कॉमिक्समधील काल्पनिक पात्रांना भारतीय अंदाजात पडद्यावर उभारण्यात आलं. या सिनेमाची दिग्दर्शनाची धुरा झोया अख्तरनं सांभाळली आहे.

Web Title: Vedang Raina confirms he is not dating Khushi Kapoor