"वाद थांबवा किंवा युद्ध करा", शर्वरी - जॉनच्या 'वेदा'चा अ‍ॅक्शनपॅक टिझर बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 12:27 IST2024-03-19T12:26:31+5:302024-03-19T12:27:49+5:30

जॉन अब्राहम - शर्वरी वाघ यांंच्या 'वेदा' सिनेमाचा टिझर एकदा बघाच

vedaa teaser out now starring john abraham and sharvari wagh | "वाद थांबवा किंवा युद्ध करा", शर्वरी - जॉनच्या 'वेदा'चा अ‍ॅक्शनपॅक टिझर बघा

"वाद थांबवा किंवा युद्ध करा", शर्वरी - जॉनच्या 'वेदा'चा अ‍ॅक्शनपॅक टिझर बघा

काहीच दिवसांपुर्वी शर्वरी वाघ-जॉन अब्राहमच्या 'वेदा' सिनेमाचं पोस्टर भेटीला आलंय. पोस्टरमध्ये शर्वरी-जॉनचा खुनशी अंदाज बघायला मिळाला. अनेकांना 'वेदा' सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. अखेर नुकतंच 'वेदा'चा टिझर भेटीला आलाय. या टिझरमध्ये शर्वरी-जॉनची अ‍ॅक्शनपॅक केमिस्ट्री बघायला मिळतेय. त्यामुळे खुप दिवसांनी बॉलिवूडमध्ये तगडा अ‍ॅक्शनपॅक सिनेमा बघायला मिळणार यात शंका नाही.

'वेदा'च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की, शर्वरी वाघ - जॉन अब्राहम व्यवस्थेशी लढताना दिसत आहेत. शर्वरीच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी घटना घडून गेलेली दिसते. त्यामुळे ती अन्यायाचा सामना करायला सज्ज असते. तिला जॉनची साथ मिळते. मग दोघे मिळून भ्रष्ट व्यवस्थेचा कसा सामना करतात, याची कहाणी 'वेदा'च्या टिझरमधून उलगडत जाते.

'वेदा'च्या निमित्ताने शर्वरी-जॉन पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या दोघांशिवाय अभिषेक बॅनर्जी सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी, तमन्ना भाटिया सुद्धा सिनेमात विशेष भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'वेदा' सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे. हा सिनेमा १२ जुलै २०२४ ला सिनेमागृहात रिलीज होईल.

Web Title: vedaa teaser out now starring john abraham and sharvari wagh